24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनवर्ल्डकप फायनलपूर्वी शमीच्या पत्नीचे वक्तव्य चर्चेत

वर्ल्डकप फायनलपूर्वी शमीच्या पत्नीचे वक्तव्य चर्चेत

टीम इंडीयाचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmad Shami) गेले काही वर्ल्डकपचे सामने खेळू शकला नाही. मात्र टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने त्या ऐवजी मोहम्मद शमीला खेळवण्यात आले आहे. शमी काही सामने, काही मालिका खेळला नव्हता. त्याला संधी देण्यात आली नव्हती. मात्र योगायोगाने त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचे शमीने सोने केले आहे. शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानी खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. यावर शमीने त्याला सुनावले. तर इंडिया आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाची दैनी अवस्था झाली होती अशा स्थितीत शमीने संपूर्ण खेळ सावरत ७ गडी बाद करत सामन्याला आपल्या बाजूने झुकवले. यावर माध्यमांनी शमीच्या पत्नीशी संवाद साधला असता शमीच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. (Hasin Jahan)

काय म्हणाली पत्नी हसीन

काही वर्षांआधी शमीवर पत्नीने अनेक आरोप लावले होते, शमीचे बाहेर अफेयर असल्याचा तिचा आरोप आहे. सध्या ते वेगळे राहत असून दोघांमध्ये मतभेद आहेत. माध्यमांनी शमीच्या खेळाबाबत विचारले असता शमीची पत्नी हसीन उत्तरली, जर खेळात जसा आहे तसा हा जर कौटुंबिक जीवनात असता तर किती बरं झालं असतं. तो चांगला माणूस असता तर मी, माझी मुलगी आनंदी असतो. असे विचार येतात मनात. शमीच्या घाणेरड्या आणि लोभी प्रवृत्तीचा आम्हाला समाना करावा लागला आहे. सध्या जे सुरु आहे, जे समोर येत आहे त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न होत आहे.

हे ही वाचा

अमित शहानंतर उदय सामंतांची अयोध्यावारी ऑफर

‘सत्तर वर्षे मराठ्यांचे वाटोळं कोणी केलं’? मनोज जरांगेंचा कडवट सवाल

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची छत्रपति संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद

शमी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, असे विचारल्यानंतर शमीची पत्नी  म्हणाली की, सध्या तो चांगली कामगिरी करत आहे, म्हणजे तो पुढेही चांगली कामगिरी करेलच असे नाही. त्याची वेळ आता चांगली आहे, म्हणून पुढेही तशीच राहिल असं नाही, प्रोफेशनल कामगिरी त्याने चांगली केली आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात तसे नाही, अशी प्रतिक्रिया शमीच्या पत्नीने दिली आहे.

इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामन्यात शमीकडे नजरा

शमीने न्यूझीलंडविरूद्ध चांगली कामगिरी केली आहे. हातातील सामना निसटून जाण्याच्या परिस्थितीत शमीने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांचे मन जिंकले. शमीने मोक्यावर झेल सोडला होता, त्यावेळा शमी अधिकच घाबरलेला गोंधळलेला होता. काही सामने काही मालिकांमध्ये शमीला संधी मिळाली नाही, आता मिळालेल्या संधीत शमीने झेल सोडल्याने तो अधिकतच चिंतेत आला, यावेळी शमीने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ७ गडी बाद करत सुटलेल्या झेलची कमतरता भरून काढत आपल्या संघाला फायनलच्या दारात नेऊन ठेवलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी