30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमनोरंजनहे आहेत 2022 साली सर्वात जास्त गाजलेले स्टार्स; रश्मिका अन् अल्लू अर्जूनचाही...

हे आहेत 2022 साली सर्वात जास्त गाजलेले स्टार्स; रश्मिका अन् अल्लू अर्जूनचाही समावेश

2022 हे वर्ष खरोखरच फक्त बॉलीवूडसाठीच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचं वर्ष ठरलं आहे ज्याने देशभरात यशस्वीपणे नाव कमवत सर्व सीमा ओलांडल्या आणि जागतिक स्तरावर आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य केले.

2022 हे वर्ष खरोखरच फक्त बॉलीवूडसाठीच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचं वर्ष ठरलं आहे ज्याने देशभरात यशस्वीपणे नाव कमवत सर्व सीमा ओलांडल्या आणि जागतिक स्तरावर आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य केले. जिथे काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नवे बेंचमार्क सेट केले, तिथेच काहींना त्यांच्या संस्मरणीय भूमिकांसाठी प्रचंड प्रशंसा मिळाली. आता 2022 हे यशस्वी संपत असतानाच यावर्षातील काही न्यूजमेकर्स वर नजर टाकूया.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा – द राइज’ने बॉक्स ऑफिसवर एक ऐतिहासिक बेंचमार्क सेट करत केवळ बॉलीवूडच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 350 कोटींहून अधिक कमाई करून सर्व मोठ्या रिलीजला मागे टाकले.

रश्मिका मंदाना
यावर्षी रश्मिकाने आपल्या उत्कृष्ट अभिनयासह सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. ‘सामी सामी’सोबत सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड करत असताना तिच्या ‘गुड बाय’ चित्रपटानेही सर्वांची मने जिंकली. त्यामुळे रश्मिका मंदाना खरोखरच पूर्ण देशाची नॅशनल क्रश बनली आहे यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा

सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

रकुल प्रीत सिंह
सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या, रकुल प्रीत सिंगने तिचे अभिनय कौशल्य दाखवत ‘थँक गॉड’, ‘कट्टपुतली’, ‘रनवे 34’ आणि ‘डॉक्टर जी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या वेगवेगळ्या भूमिका दाखवल्या.

(रॉकिंग स्टार) यश
आपल्या विशेष व्यक्तिमत्त्वाने आणि तसेच अभिनयाच्या कौशल्याने, केजीएफ: चॅप्टर २ (KGF: Chapter Two) या चित्रपटाला मिळालेल्या यशासह गाठले. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नवीन विक्रम रचले. तसेच, चित्रपटाचे हिंदी व्हर्जन ‘बाहुबली: द कन्क्लूजन”नंतर भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला.

क्रिती सॅनन
क्रिती सॅनन आणि वरुण धवन अभिनित भेडियाची संकल्पना नवीन होती त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पुरुष वर्चस्व असलेल्या चित्रपटात ही ऑफबीट आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची क्षमता क्रितीशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्रीमध्ये नाही. तसेच, क्रिती सॅननच्या ‘ठुमकेश्वरी’या गाण्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, क्रितीने पूर्ण वर्षामध्ये लोकप्रिय मासिकांची मुखपृष्ठे देखील मिळवली आहेत. तसेच, प्रतिष्ठित पुरस्कार देखील जिंकले आहेत.

विजय वर्मा
इम्तियाझ अलीच्या ‘शी'(SHE) मध्ये कुख्यात नारकोटिक्स डीलर सस्या तसेच ‘गली बॉय’मध्ये मोईनची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर, विजय वर्माने जसमीत के रीनच्या ‘डार्लिंग्ज’मध्ये एका जटिल माणसाची भूमिका साकारत चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला. पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेता विजय वर्माने, ‘डार्लिंग्ज’मध्ये आलिया भट्टचा अपमानास्पद नवरा हमजा म्हणून भूमिका साकारली. ‘डार्लिंग्ज’मधील या अभिनयाला खूप प्रशंसा आणि कौतुक मिळाले, तसेच या पात्राबद्दल खूप तिरस्कारही झाला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!