32 C
Mumbai
Tuesday, May 2, 2023
घरमनोरंजनप्रसिद्ध अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण; स्वत: फोटो शेअर करत दिली माहिती

प्रसिद्ध अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण; स्वत: फोटो शेअर करत दिली माहिती

दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमणचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये अनिकाचे सुजलेले डोळे आणि अंगावर जखमा दिसत आहेत. अनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमणचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये अनिकाचे सुजलेले डोळे आणि अंगावर जखमा दिसत आहेत. अनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण हेही तिनी सांगितले आहे. वास्तविक अनिकाने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत असे कृत्य केले आहे. हा फोटो पाहून अनिकाच्या चाहत्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शिवाय अनेक चाहत्यांनी अनिकाबाबत सहानुभुती व्यक्त करत तिला जखमांमधून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

संपूर्ण देशात होळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच अनिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्यासोबत जे काही घडले ते सोडले असूनही, मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली जात आहे. दुर्दैवाने, मी अनूप पिल्लई नावाच्या माणसाला डेट करत होतो, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल.” अशा शब्दांत अनिकाने पोस्टच्या सहाय्याने आपले दु:ख व्यक्त केले आहे.

 

यासोबत अनिकाने पुढे लिहिले आहे की, “जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. या कृत्यानंतर तो माझ्या पाया पडला आणि रडू लागला. त्याला क्षमा करायला मी मूर्ख होते. दुसऱ्यांदा त्यानी मला बेंगळुरूमध्ये मारहाण केली, त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना पैसे दिले होते आणि त्यांनी आम्हाला आपापसात मिटवायला सांगितले होते. यानंतर माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याचे धाडस त्यानी केले.”

हे सुद्धा वाचा

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

आनिका विक्रमन ही मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तिचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. तो ‘विषमकरण’, ‘आयकेके’ आणि ‘एंगा पट्टन सोथू’ सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र सध्या तिने शेअर केलेल्या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये अनिकाच्या एक्स बॉयफ्रेंडला कठोर शिक्षा व्हावी आणि अनिकाला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी