30 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमनोरंजनBigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री 'बिग बॉस मराठी'च्या घरात

Bigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री ‘बिग बॉस मराठी’च्या घरात

बिग बॉसच्या घरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अर्थात मिसेस उपमुख्यमंत्री यांची एंट्री होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

सध्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही बिग बॉसला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्स च्या हिंदी आणि मराठी वाहिनीवर सध्या बिग बॉस हिंदी आणि बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) प्रसारित करण्यात येत आहे. हल्ली बिग बॉस मराठीच्या घरात अनेक अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री आणि लावणी कलाकार मेघा घाडगे यांना या घराचा निरोप घ्यावा लागला. पण आता बिग बॉसच्या घरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) अर्थात मिसेस उपमुख्यमंत्री यांची एंट्री होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्याचनिमित्ताने अमृता फडणवीस देखील या पाहुण्या म्हणून या घरात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळीच्या निमित्ताने बिग बॉसकडून घरातील सदस्यांना एक विशेष कार्य देण्यात आले आहे. या कार्याच्या निमित्ताने घरात काही पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या कार्याच्या पहिल्या उपकार्यात कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील अभिनेता राजवर्धन अर्थात विवेक सांगळे आणि या मालिकेतील अभिनेत्री कावेरी अर्थात तन्वी मुंडले यांनी हजेरी लावली.

पहिल्या उपकार्यात घरातील स्पर्धकांना गुलाबजाम बनवण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अमृता देशमुख यांच्या संघाने बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या टास्कमध्ये स्पर्धकांना घरातील स्पर्धकांची नक्कल करण्यास सांगण्यात आले आहे. पण आता अमृता फडणवीस यांची घरात एंट्री झाल्यानंतर घरातील स्पर्धकांना काय टास्क देण्यात येणार हे अद्यापही कळू शकलेले नाही.

हे सुद्धा वाचा

Siddharth And Kiara : ‘Thank God’च्या निमित्ताने सिद्धार्थ अन् कियारा घालवणार एकांतात वेळ! वाचा काय आहे स्पेशल प्लॅनिंग

Rishi Sunak: सुधा मूर्तीं म्हणाल्या काँग्रॅच्युलेशन्स ऋषी!

Amitabh Bachhan : ‘केबीसी’च्या सेटवर बीग बीं सोबत मोठा अपघात; शुटींग दरम्यान नस कापली गेली

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. अमृता फडणवीस यांनी बिग बॉसच्या ‘नमस्कार, हाय’ म्हणत एंट्री केली. तसेच त्यांनी घरात येताच तुळशी वृंदावनाला नमस्कार केला. आता स्वतः अमृता फडणवीस या घरात दाखल झाल्याने स्पर्धकही त्याच उत्साहात दिसून आले. स्पर्धकांनी अमृता फडणवीस घरात येताच त्यांना नमस्कार करत त्यांचे घरात स्वागत केले. दरम्यान, आता अमृता फडणवीस या घरात दाखल झाल्या असल्याने बिग बॉस घरातील स्पर्धकांना आणखी काय हटके कार्य देतात हे पाहण्याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अमृता फडणवीस दाखल होणार असल्याचा भाग आज (ता. 26 ऑक्टोबर) रात्री 10 वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!