28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमनोरंजन'मुफासा - द लायन किंग' चा हिंदी ट्रेलर रिलीज, शाहरुख खान सोबत...

‘मुफासा – द लायन किंग’ चा हिंदी ट्रेलर रिलीज, शाहरुख खान सोबत ऐकायला मिळणार आर्यन आणि अबरामचा आवाज 

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा डिजनी हॉटस्टारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'मुफासा: द लायन किंग'मध्ये मुफासाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे ज्यामध्ये केवळ शाहरुख खानचे पुनरागमन दिसत नाही तर त्याची मुले आर्यन आणि अबराम देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. (mufasa the lion king hindi trailer released shah rukh khan and sons aryan abram lend voices)

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा डिजनी हॉटस्टारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मुफासा: द लायन किंग’मध्ये मुफासाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे ज्यामध्ये केवळ शाहरुख खानचे पुनरागमन दिसत नाही तर त्याची मुले आर्यन आणि अबराम देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. (mufasa the lion king hindi trailer released shah rukh khan and sons aryan abram lend voices)

क्रिती सेननच्या ‘या’ चित्रपटाचे बनणार सिक्वेल, अभिनेत्रीने केला खुलासा

ट्रेलरमध्ये आर्यन खानने सिंबाला आपला आवाज दिला आहे, तर अबरामने तरुण मुफासाला आवाज दिला आहे. बारी जेनकिन्स दिग्दर्शित हा चित्रपट भारतात 20 डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (mufasa the lion king hindi trailer released shah rukh khan and sons aryan abram lend voices)

जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार ‘भूल भुलैया 3’ चा टीझर

या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या मुलांसोबत काम करताना शाहरुख खान म्हणाला, “मुफासा: द लायन किंग हा मुफासाच्या लहानपणापासून ते एक अद्भुत राजा बनण्यापर्यंतच्या जीवनाचा प्रवास दाखवतो आणि हि भूमिका पुन्हा साकारणे विलक्षण आहे. डिजनी हॉटस्टार सोबत माझे हे विशेष सहकार्य आहे, विशेषत: कारण माझी मुले आर्यन आणि अबराम या प्रवासाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासोबत हा अनुभव शेअर करणे खरोखर अर्थपूर्ण आहे.” चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि शाहरुख खानसोबतच्या त्यांच्या मुलांची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (mufasa the lion king hindi trailer released shah rukh khan and sons aryan abram lend voices)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी