काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू आता कॅन्सरमुक्त झाल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी सिद्धूने सांगितले कवी, त्यांच्या पत्नीने कशाप्रकारे कर्करोगाचा पराभव केला. तसेच, यावेळी त्यांनी आपले घरगुती उपाय देखील शेअर केले आहेत आणि ते आपल्या पत्नीला काय खायला घालायचे याचा खुलासा केला आहे. (navjot singh sidhu wife declared clinically cancer free)
जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावेंच्या “संगीत मानापमान” चित्रपटाचा टिझर
61 वर्षीय नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की त्यांची पत्नी कर्करोगमुक्त आहे. ते म्हणाले, ‘सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी नोनीला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा मी तुरुंगात होतो आणि तिने मला सांगितले नाही. नोनीने खूप संघर्ष केला आहे. ती घरोघरी फिरत राहिली. पण माझ्या मित्राने आणि डॉक्टरांनी खूप मदत केली.’ सिद्धूने अमृतसर येथील त्यांच्या घरी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना नोनीच्या कर्करोगाची माहिती खूप उशिरा मिळाली. (navjot singh sidhu wife declared clinically cancer free)
‘मिर्झापूर द फिल्म’ चा टीझर रिलीज, आता मोठ्या पडद्यावर होणार गोंधळ
ऑपरेशन झाल्यावरच मला याची माहिती मिळाली, असे ते म्हणाले. तथापि, आज मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, नोनीला वैद्यकीयदृष्ट्या कर्करोगमुक्त घोषित करण्यात आले आहे. नवज्योतने बुधवारी सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीला जेवण देताना दिसत होता. यावेळी त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर एकही केस दिसत नव्हता, त्यामागे कर्करोगावरील उपचार असल्याचे सांगितले जात आहे. (navjot singh sidhu wife declared clinically cancer free)
सध्या नवज्योत कौर सिद्धू कर्करोगमुक्त झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकून सर्वजण आनंदी असून या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या गुड न्यूजशिवाय सिद्धूच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनमध्ये तो पुन्हा एकदा कपिल शर्माच्या जोक्सवर हसताना दिसत आहे. (navjot singh sidhu wife declared clinically cancer free)