30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली 'सिक्रेड गेम्स'च्या पडद्यामागची गोष्ट

नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली ‘सिक्रेड गेम्स’च्या पडद्यामागची गोष्ट

सेक्रेड गेम्समुळेच नवाजुद्दीनच्या करिअरला मिळाले नवे वळण, या सीरिजमुळे मिळाली अनेक सीरिजमध्ये काम करण्याची संधी.

चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने खुलासा केला की त्याला सेक्रेड गेम्समध्ये काम करायचे नव्हते. त्याला चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटात काम करण्यासाठी राजी केले होते. ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. सेक्रेड गेम्समुळे नवाजुद्दीनच्या करिअरला नवे वळण मिळाले. यानंतर त्याला अनेक वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. नवाजुद्दीन शिवाय सेक्रेड गेम्स सिरीजमधीमल इतरही अनेक कलाकारांची यात महत्त्वाची भूमिका होती.

सेक्रेड गेम्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
विशेष म्हणजे सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज खूप पसंत केली जात आहे. प्रेक्षकांन कडुन ही सिरीजल चांगला प्रतिसाद मिळाला होता. नवाजुद्दीने या वेळी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2022’ च्या मास्टर क्लास सेशनमध्ये भाग घेतला आहे. या प्रसंगी त्याने आपल्या संघर्षाचे दिवस आठवत अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच वेळी, तो त्याच्या लोकप्रिय सिरीज सेक्रेड गेम्सबद्दल ही खुप काही बोलला. या सिरीजची निर्मिती अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी केली आहे.

‘मला ओटी़टी (OTT) बद्दल जास्त माहिती नव्हती’- नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, ‘जेव्हा मला पहिल्यांदा सेक्रेड गेम्ससाठी अप्रोच करण्यात आले तेव्हा मी त्यांची ऑफर नाकारली. कारण मला वाटले की ही एक टीव्ही सिरीज आहे आणि मला ओटी़टी बद्दल जास्त काही माहिती ही नव्हते. मी त्यांला नेहमी विचारायचो की ओटी़टी म्हणजे काय असते आणि ओटी़टी कोण करतो. तेव्हा मला सांगण्यात आले की ही सिरीज 190 देशांमध्ये एकाच वेळी प्रसारित केली जाईल. आणि हे ऐकूण सुद्धा माझा उत्साह काही वाढला नाही.

हे सुद्धा वाचा

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

Virat Kohli : ‘विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये?’ किवी कर्णधार केन विल्यमसनचे दिलखुलास उत्तर

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…

अनुराग कश्यपने केले सिरीज करण्यासाठी तयार
नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाला, ‘ मी सिरीजसाठी नाही बोलुन सुद्धा, अनुराग कश्यपने माझा पाठलाग काही सोडला नाही. त्याने मला ही सिरीज करायला लावली. त्यांनी मला लाईटीच्या माध्यमातूम 190 देश दाखवले आणि म्हणाले, जिथे दिवे चालू असतील तिथे ही सिरीज दिसेल.’ विशेष म्हणजे सेक्रेड गेम्समुळे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या करिअरला नवे वळण मिळाले. यानंतर त्याने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. याप्रसंगी त्यांने हॉलिवूड आणि बॉलीवूडची तुलना केली सुद्धा केली. दोन्ही ठिकाणचे फायदे आणि तोटेही त्यांनी सांगितले. नवाजुद्दीन सिद्दीकीचे चित्रपट चांगलेच पसंत केले जातात. एक चांगला अभिनेता म्हणून तो खूप प्रसिद्ध आहे. त्याची स्टाइल चाहत्यांनाही आवडते. त्याने आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांसोबत काम सुद्धा केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!