30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरमनोरंजनमाधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या नेटफ्लिक्सला चाहत्याची कायदेशीर नोटिस!

माधुरी दीक्षितवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या नेटफ्लिक्सला चाहत्याची कायदेशीर नोटिस!

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय अमेरिकन कॉमेडी शो ‘द बिग बँग थिअरी’मध्ये माधुरी दीक्षितबाबत आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवण्यात आली आहे. मिथून विजय कुमार या व्यक्तीने ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात तुलना केली आहे. दरम्यान यामध्ये माधुरीचा उल्लेख ‘प्रॉस्टि्यूट’ असा करण्यात आला आहे.

वास्तविक, हे प्रकरण ‘बिग बँग थिअरी’च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमधील एका दृश्याशी संबंधित आहे. या सीनमध्ये ‘राज कूथरापल्ली’ची भूमिका साकारणारा कुणाल नय्यर आणि ‘शेल्डन’ची भूमिका साकारणारा जिम पार्सन्स टीव्हीवर ‘कहो ना प्यार है’ पाहत  असतात. त्यानंतर चित्रपटात अमिषा पटेलला पाहून ‘शेल्डन’ विचारते, ‘ही स्त्री ऐश्वर्या राय आहे का?’ यावर उत्तर देताना राज म्हणतो, ‘हो. ती किती छान अभिनेत्री आहे!’ पुढे, शेल्डन सहमत नाही आणि म्हणतो, ‘मला वाटते ती गरीबांची माधुरी दीक्षित आहे.’ इथे शेल्डनच्या बोलण्यावर राजला राग येतो. या एपिसोडमध्ये तो ऐश्वर्या रायला ‘देवी’ आणि माधुरी दीक्षितला तिच्या तुलनेत (leperous prostitute) ‘कुष्ठरोगी वेश्या’ म्हणतो.

या दरम्यान संतापलेला चाहता मिथुन विजय कुमारने यासंदर्भात नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषकांनी नाराजी व्यक्त करत हा भाग लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, ‘या एपिसोडमधील शोचे पात्र राज कूथरापल्ली यांची टिप्पणी केवळ आक्षेपार्ह नाही तर अपमानास्पद आहे. याचा समाजावर नकारात्मक प्रभाव पडतो. विशेषत: ही टिप्पणी महिलांवरील रूढीवादी विचारांना कायमस्वरूपी ठेवणारी आहे. कुमारने पुढील कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘या प्रकारचा मजकूर महिलांबद्दल द्वेषाला चालना देणारा आहे आणि तो कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही’.

हे सुद्धा वाचा :

‘आज सकाळी उठले आणि…’ आईच्या निधनानंतर माधुरीची भावुक पोस्ट

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

काय सांगता ! आता मोबाईल इंटरनेट आणि OTT सबस्क्रिप्शन मिळणार फुकटं

मिथुन विजय कुमारने स्वतःला अभिनेत्रीचा मोठा चाहता असल्याचे सांगून नेटफ्लिक्सच्या मुंबई कार्यालयाला ही नोटीस पाठवली आहे. यासोबतच लेखकाने नेटफ्लिक्सकडून तातडीने उत्तर मागितले आहे. जर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने त्यात केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मिथुन त्याविरोधात आणखी कडक कायदेशीर कारवाई करेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. येथे, या संपूर्ण प्रकरणावर नेटफ्लिक्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी