30 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनअन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच 'हिला' केले किस

अन् भर कार्यक्रमात निकने प्रियंकासमोरच ‘हिला’ केले किस

निक जोनास, भाऊ जो आणि केविन यांच्यासह यूएस दौर्‍यावर आहेत. नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये निकची पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरी सामील झाल्या. मालतीने पहिल्यांदाच वडिलांच्या जाहीर कार्यक्रमात सहभाग घेतला. पत्नी प्रियांका आणि मुलगी मालतीला पाहून निकने भर कार्यक्रमात मुलीच्या हाताचे चुंबन घेतले. मुली वडिलांचे नाते पाहून प्रियंकानेही आनंदाने स्मितहास्य दिले. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला आहे.

जोनस बंधू यांच्या लाईव्ह संगीत कार्यक्रमात निक गाणे गात होता. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत प्रियांका आणि मालती होत्या. मालतीला प्रियंकाने कडेवर घेतले होते. गाणे ऐन रंगात आले असताना पहिल्याच रांगेत उभ्या असलेल्या प्रियंका आणि मालतीकडे निकचे लक्ष गेले. गाणे गातच तो दोघींच्या जवळ गेला. गाणे थांबवून त्याने मालतीच्या डोक्याचे चुंबन घेतले. हा व्हिडिओ प्रियंका आणि निक फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला. व्हिडिओवर अनेक जणांनी प्रतिक्रिया लिहिल्या. ‘डॅडीची मुलगी’ ही प्रतिक्रिया सर्वात जास्त पाहायला मिळाली. एकाने मालतीला वडिलांसोबत गायचे आहे, अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली.

प्रियांका आणि निक यांनी दोन वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे मालती मेरीला जन्म दिला होता. दोघेही सोशल मीडियावर मालतीचा चेहरा दाखवणे टाळतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी मालतीला दोघेही आता बिनधास्त फिरवतात. बगीचा, कार्यक्रम यात मालती आई प्रियंकासोबत हमखास दिसते. फोटोग्राफर्ससोबत प्रियंका मालतीसोबत पोज देत नाही.


प्रियंका मे महिन्यात चुलत बहीण परिणीती चोप्राच्या साखर पुड्यासाठी भारतात आली होती. मात्र, परिणीतीच्या लग्नाला तिला हजर राहता आले नाही. प्रियंकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे परिणीती आणि राघव चढ्ढा यांना शुभेच्छा दिल्या. प्रियंका म्हणाली, ” नवविवाहित जोडप्यांना खूप प्रेम ! राघव,चोप्रा कुटुंबात आपले स्वागत आहे … आशा आहे की तू आमच्या वेडेपणात डुबकी मारण्यास तयार आहेस. तिशा (परिणीती) तू सर्वात सुंदर वधू आहेस…तुला आणि राघवला आयुष्यभरासाठी खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद. एकमेकांची काळजी घ्या”

हे ही वाचा 

विखुरलेल्या केसात चिडलेल्या कार्तिकला पाहून फॅन्स म्हणाले..

माहिरा खानच्या अदांनी सगळेच घायाळ

कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!

येत्या काळात प्रियंका फरहान अख्तरचा चित्रपट ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी उत्सुक आहे. प्रियंकाचे लग्न, मुलीचा जन्म यात प्रियंकाने चित्रपटाला अपेक्षित तारखा दिल्या नाहीत. दरम्यानच्या काळात चित्रपटातील अन्य अभिनेत्री कतरीना कैफ आणि आलिया भटचे लग्न झाले. आलियानेही गोंडस मुलीला जन्म दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी