तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पुन्हा एकदा मित्रांच्या गप्पा, कॉलेज कट्टा, कॅन्टींगमधील मस्ती आणि कॉलेजफेस्ट यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आला आहे. या धर्तीवर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबईचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव स्पेक्ट्रम 23 (SPECTRUM’23) डिजिटल मीडिया पार्टनर “लय भारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अर्थातच NIFT-मुंबईच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा वीकेंड कमाल जाणार आहे. मुख्यतः 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी 2 दिवसीय सांस्कृतिक महोत्सव भरणार असून यामध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरी-कौशल्याचा यात समावेश असणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबईतर्फे 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी वार्षिक सांस्कृतिक महोत्सव स्पेक्ट्रम 23 (SPECTRUM’23) डिजिटल मीडिया पार्टनर “लय भारी” या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एकत्र येऊन क्रीडा, कला, साहित्यिक कार्यक्रम, वादविवाद, फॅशन शो इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात आणि त्यांच्या हुनर दाखवितात. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी @NIFTMUMBAI SPECTRUM 23′ संस्थेच्या संकेत स्थळाला भेट द्या.

या महोत्सवात पहिल्या दिवशी फॅशन मिस्ट्री बॉक्स, ग्रुप डान्स, कोरस गायन, बॅटल ऑफ बँड्स, श्री आणि सुश्री स्पेक्ट्रम, फॅशन शो, क्रिएटिव्ह मेकअप आणि केशरचना, फुटसल (3+3 मिक्स), बास्केट बॉल (B&G), बॅडमिंटन एकेरी (B&G), बुद्धिबळ (ऑफलाइन), सीओडी (मल्टी-प्लेअर) हे कार्यक्रम होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी अंदाज-ए-बयान (हिंदी), कथा सांगण्याची स्पर्धा, नुक्कड नाटक, B&W मधील कथा, रील इट, शॉर्ट फिल्म म्हणून व्हिडिओग्राफी, डीजे रात्री, हुल्ला हुप, शौर्य, टेबल टेनिस एकेरी (B&G) हे कार्यक्रम पार पडणार आहेत.
1995 मध्ये फॅशन कॅपिटल ऑफ इंडिया मध्ये स्थापित असलेली NIFT आज मुंबई नवी मुंबईत 10 एकर परिसरात पसरलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट वसतिगृह सुविधा, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्च सुसज्ज प्रयोगशाळा आणि मशीन रूम, कॅम्पसमध्ये अद्ययावत क्रीडा पायाभूत सुविधा आणि देखरेख ठेवलेल्या सुसज्ज मेसची सुविधा आहे. मजबूत इंडस्ट्रीजच्या संबंधासह संस्थेकडे उच्च प्रशिक्षित विद्याशाखा आहेत. त्याचप्रमाणे NIFT मुंबई, सर्व NIFT केंद्रांमध्ये इच्छुकांना रोजगाराच्या संधी देखील देते.
हे सुद्धा वाचा :
अखेर दोन वर्षानंतर काळा घोडा सज्ज; लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन
दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या “पास आऊट” लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा