30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमनोरंजनNilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

मराठी सुपरस्टार निळू फुले (Nilu Phule) यांच्या जिवनावरील चित्रपट लवकरच पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी सुपरस्टार निळू फुले (Nilu Phule) यांच्या जिवनावरील चित्रपट लवकरच पेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निळू फुले यांचा बायोपिक हा रस‍िक प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. या चित्रपटात त्यांनी केलेल्या वैशिष्टयपूर्ण प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. निळू फुले यांनी एक अभ‍िनेता आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भूमीका अत्यंत तरलतेने साकारली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू या चित्रपटामध्ये उलगडण्यात आले आहेत. त्यांच्या अभिनयाची सुरूवात कथा अकलेच्या कांद्याची या मराठी लोकनाटयाने झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. निळू फुले मराठी चित्रपटाचे सुपरस्टार झाले. त्यांचे व्यक्तीमत्त्व रस‍िक प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे असेच होते. त्यांच्या नकारात्मक चित्रपटांनी देखील रसिकांच्या मनावर गारुड केलं.

प्रत्येक भूमीका त्यांनी अत्यंत समरसतेने साकारली. एका अभ‍िनेत्याचे जीवन, आयुष्यातील चढ-उतार, त्यांना आवडलेल्या गोष्टी, आपल्या खऱ्या आयुष्यात त्यांचा नवरा, वडील, मुलगा या भूमीका कशा होत्या हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टिप्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष कुमार तौरानी यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, मराठी चित्रपट जगतात निळू फुले यांचे खूप मोठे योगदान आहे. हा चित्रपट म्हणजे त्यांचा सन्मान आहे. या चित्रपटासाठी त्यांची मुलगी गार्गी हिच्याकडून परवानगी मागण्यात आली असून, लवकरच चित्र‍िकरणाला सुरूवात होणार आहे.

यावर त्यांची मुलगी गार्गी यांनी फुले म्हणाली, प्रसादने वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट बनवण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चित्रपट बनवण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याचा शोध सुरू आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. बायोपिक किरण यज्ञोपवित यांनी लिह‍िला आहे.

हे सुद्धा वाचा

Fever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार

Chandigarh University : धक्कादायक बातमी ! चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला

तर प्रसाद ओक म्हणतात की, निळू फुले यांच्या बरोबर काम करणे हा मोठा अनुभव आहे. त्यांच्यावर चित्रपट बनविणे ही मोठी संधी आहे. ते मला गुरू सारखे आहेत. दिलीप अडवाणी आणि नेहा शिंदे हे सर्जशिल निर्माते असून, सहयोगी निर्माते आहेत. अविनाश चाटे, अर‍िजीत बोरठाकूर आणि तन्नाज बंदूकवाला यामध्ये भूमीका असणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी