अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस दोघांचंही वेडिंग रिसेप्शन चंडीगडमध्ये पार पडणार आहे. सध्या दोघांचं वेडिंग रिसेप्शनकार्ड सोशल मीडियावर व्हायरल होतंय. येत्या २२ आणि २३ सप्टेंबरला परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं लग्न आहे. दोघांनीही लग्नाच्या तारखे बद्दल कमालीची गुप्तता पाहिली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात दिल्लीत दोघांचा साखरपुडा पार पडला. आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनस सातासमुद्राहून भारतात आली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला ‘आम आदमी पार्टी ‘या राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. ‘आम आदमी पार्टी ‘(आप) पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवत सिंगमन यांनीही साखरपुड्याला हजेरी लावून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा प्रेमविवाह आहे. दोघंही परदेशात एकत्र शिकायला होते. याचदरम्यान परिणीती आणि राघव दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. भारतात परतल्यानंतर परिणीतीनं चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी जॉईन केली. दीड वर्षांपूर्वी पंजाब मध्ये चित्रपटाच्या शूटिंग निमित्तानं परिणीती आल्याचं समजतात जवळच कामासाठी आलेल्या राघव चड्ढानं तिला संपर्क केला. दोघांनीही सकाळी नाश्त्यासाठी भेटायचं ठरवलं. या भेटीदरम्यानच परिणीती आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं बोललं जातं.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला परिणीती आणि राघव यांची मुंबईत भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांनाही एका हॉटेलमधून बाहेर पडताना फोटोग्राफर्सनं पकडलं. त्याचवेळी दोघांचं बिंग फुटलं. दोघांना अनेकदा मुंबई आणि दिल्ली विमानतळावर पाहिलं गेलं. दिल्लीत संसदेबाहेर राघव चड्ढा यांना परिणीतीबद्दल फोटोग्राफरने विचारताच ” तुम्ही राजकारणाबद्दल बोला परिणीतीबद्दल नाही” असं त्यांनी हसत उत्तर दिलं. अखेरीस एप्रिल महिन्यात दिल्लीत दोघांचाही साखरपुडा झाला.
हे सुद्धा वाचा
शाहरुखच्या ‘जवान’नं ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला!
लहानग्या कन्हैय्यांसोबत अभिनेता विकी कौशलनं फोडली दहीहंडी !
राजकारणात अस्पृश्यता पाळली जाते – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला
जून महिन्यात राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना राजस्थान येथील उदयपूर शहरात पाहिले गेले. त्याचवेळी उदयपूर शहरात दोघंही डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं समजलं. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा ऑक्टोबर महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा होती. दोन आठवड्यापूर्वी या जोडप्यानं मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकालेश्वर मंदिरात एकत्र पूजा केली. यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीला दोघांनाही मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. अद्यापही राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लग्नाच्या अधिकृत तारखेबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाहीये. ‘लय भारी टीम’कडून या गोंडस जोडप्याला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.