29 C
Mumbai
Monday, November 27, 2023
घरमनोरंजनकोणी दिली प्रेमाची कबुली? अखेर परिणीती आणि राघवनं मौन सोडलं

कोणी दिली प्रेमाची कबुली? अखेर परिणीती आणि राघवनं मौन सोडलं

परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची नवलाई अजून सुरूच आहे. ‘झट मंगनी पट शादी’ झाल्यानंतर परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या प्रेमाचा वर्षाव वाढतच चालला आहे. लग्नानंतर सासरी परिणीतीचे धूमधडाक्यात स्वागत झाले. त्याबाबतचा व्हिडिओ राघव चड्ढाने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अपलोड केला. आपल्या प्रेमाची कबुली खुद्द परिणीतीनेच सर्वप्रथम दिल्याचे तीने सर्वांसमोर कबूल केले.

शुक्रवारी परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज-भारतातील सर्वात मोठे बचाव कार्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सगळ्या झगमगटापासून परिणीती दूर आहे. दिल्लीत आपल्या सासरी राहणाऱ्या परिणीतीला सध्या आपल्या संसारावर लक्ष केंद्रित करायचे आहे. परिणीती आणि राघवने लग्नानंतर आपल्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र क्रिकेट मॅचची स्पर्धा खेळून एकमेकांसोबत वेळ घालवला. या अविस्मरणीय क्षणांचा व्हिडिओ परिणीती आणि राघवने आपापल्या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra


शुक्रवारी राघवने युट्युबवरील आपल्या अधिकृत चॅनेलवर परिणीतीच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ पोस्ट केला. सासरच्या मंडळीनी घरात प्रवेश करताच दोघांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. दोघांपैकी कोणी पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली असा प्रश्न विचारताच परिणीतीने हात वर केला. दोघांमध्ये खोडकर कोण आहे, या प्रश्नावरही परिणीती हात वर केला. त्यावर सर्वांनाच हसू आले. परिणीतीकडून सासरी सर्वप्रथम काम करून घेण्याच्या प्रथेदरम्यान राघवने मिश्किल शैलीत तिचा समाचार घेतला. माझे सासर जगातील सर्वात चांगले कुटूंब असल्याचे परिणीतीने व्हिडिओच्या अखेरीस सांगितले.

हे ही वाचा 

फिटनेस फ्रिक बिपाशासोबत मुलगी देवीही करते योगा

आता मराठी मनोरंजन उद्योगाची चर्चा परिषद!

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

गेल्या वर्षी पंजाबमध्ये परिणीती चोप्राच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांचेही प्रेम जडले. दोघेही एकमेकांना आपापली व्यावसायिक कारकीर्द सुरु होण्याअगोदरपासून ओळखतात. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान दोघांची ओळख झाली. भारतात परतल्यानंतर दोघेही फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. गेल्यावर्षी पंजाबमध्ये दौऱ्यावर असलेल्या राघवला परिणीतीचे जवळच शूटिंग सुरु असल्याचे समजले. दोघांनीही एकत्र सकाळची न्याहारी केली. आपण एकमेकांसाठी जीवनसाथी म्हणून योग्य असल्याचे दोघांनाही जाणवले.

व्यावसायिक पातळीवर राघव सध्या केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहे. आम आदमी पक्षाच्यावतीने राष्ट्रीय सर्व राजकीय पक्षांच्या बैठकांमध्ये राघव जातीने हजर असतो तर परिणीतीकडे फारसे काही खास प्रोजेक्ट नाहीयेत. त्यामुळे सध्या परिणीती दिल्लीत आपल्या संसारातच मग्न झालीये.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी