अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढाच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख आता समोर आली आहे. परिणीती आणि राघव ४ ऑकटोबरला मुंबईत बॉलिवूड कलाकारांसाठी लग्नाचं रिसेप्शन देणार असल्याची पक्की खबर आहे. २३ सप्टेंबरला राजस्थान येथील उदयपूर शहरात परिणीती आणि राघव लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिणीती दिल्लीत आपल्या सासरी परतली.
उदयपूर येथील महालात तीन दिवस लग्नसोहळा पार पडला. कुटुंबीय, जवळचा मित्रपरिवार आणि आप पक्षातील आणि इतर राजकीय पक्षातील राजकीय नेत्यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. लग्नातील फोटो मीडियात वेळेअगोदर लीक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली गेली. या लग्नसोहळ्यासाठी तब्ब्ल १५ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जाते. सध्या परिणीती आणि राघव दोघंही दिल्लीत आहे. त्यांनी हनिमूनसाठी परदेशात जाणं तूर्तास टाळलंय.
परिणीती आणि अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तातडीने पहिलं गाणंही प्रदर्शित करण्यात आलंय. परिणीतीला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हनिमून पुढे ढकलावं लागतंय. परिणीती मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यानंतर काही दिवस मुंबईतच राहणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत परिणीतीचं करियर फारसं बहरलं नाही. ती बराच काळ सिनेमापासून लांब होती. तिच्याकडे आताही फारसे चित्रपट नाही. परिणीतीच्या तुलनेत नवख्या सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत.
हे सुद्धा वाचा
यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार?
बाबासाहेबांना छळणारे हिंदू, पारसी माफी मागतील का – जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
परिणीती चोप्राची दिवाणगी; नवऱ्याला घातली अशी साद !
परिणीतीच्या विवाहसोहळ्यात हिंदी सिनेसृष्टीतून केवळ फेशन डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि तिचा नवरा उपस्थित होते तर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही उपस्थिती लावली. आता परिणीती मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडमधून कोणाकोणाला बोलावतेय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.