30 C
Mumbai
Tuesday, November 28, 2023
घरमनोरंजनपरिणीती चोप्राची दिवाणगी; नवऱ्याला घातली अशी साद !

परिणीती चोप्राची दिवाणगी; नवऱ्याला घातली अशी साद !

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे सनई चौघडे अजूनही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आपल्याच लग्नात परिणीतानं खास राघवला स्वतः गायलेलं गाणं ऐकवून सरप्राईज दिलं. ‘ओ पिया चल चलेया ओ चलेया’ या स्वतःच गायलेलं गाणं सर्वासमोर रेकॉर्डरवर सुरु असतानाच परिणीतीनं लग्नमंडपात प्रवेश घेतला. यावेळी राघवजवळ येताच तिनं हे गाणं गायलंही. या गाण्याचा व्हिडिओ परिणीतीनं इंस्टाग्रामवर शेअर केला.

२३ सप्टेंबरला राजस्थान येथील उदयपूर शहरातील महालात परिणीती आणि राघव लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिणीती दिल्लीत आपल्या सासरी परतली. यावेळी लग्नाचे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात व्हिडिओग्राफर्सनी टिपले. यावेळी परिणीती स्वतः राघव मंडपात येताना लपून पाहत होती. थोड्यावेळानं नववधूनंही लग्नमंडपात प्रवेश केला. आपल्या नववधूला पाहून राघवही भारवला. त्यानं डोळे मिचकवून हात हलवत परिणीती आज खूप सुंदर दिसत असल्याचं कळवलं. त्याचवेळी राघवसाठी परिणीतीनं राघवसाठी खास गाणं गायल्याची घोषणा झाली.पंजाबी बोल असलेल्या गाण्यात परिणीतीचे सूर सहज उमटले. हे गाणं माझ्यासाठी आतापर्यंतचं सर्वात आवडतं गाणं आहे, असं परिणीतीनं सांगितलं.

हे सुद्धा वाचा 
जान्हवी कपूर अश्लील पॉर्न चित्रपटात? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य
विजय देवरकोंडाचं गर्लफ्रेंड रश्मिकाबद्दल मोठं वक्तव्य
मुलीने पडद्यावर चुंबन घ्यावे का; रविना टंडन म्हणाली…

उदयपूर येथील महालात तीन दिवस लग्नसोहळा पार पडला. कुटुंबीय, जवळचा मित्रपरिवार आणि आप पक्षातील आणि इतर राजकीय पक्षातील राजकीय नेत्यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. लग्नातील फोटो मीडियात वेळेअगोदर लीक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली गेली. या लग्नसोहळ्यासाठी तब्ब्ल १५ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जाते. सध्या परिणीती आणि राघव दोघंही दिल्लीत आहे. त्यांनी हनिमूनसाठी परदेशात जाणं तूर्तास टाळलंय.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी