28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमनोरंजन'जवान' चित्रपटाची क्रेझ पाहताच बाहुबली घाबरला!

‘जवान’ चित्रपटाची क्रेझ पाहताच बाहुबली घाबरला!

शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’ येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. आठवड्याभरापूर्वी ‘जवान’ चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली. तब्बल दीड लाखाहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचण्याची दाट शक्यता आहे. चित्रपटाची वाढती क्रेझ पाहता बाहुबली प्रभासनं आपल्या आगामी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. प्रभासचा ‘सलार’ चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, आता सिनेमाचा प्रदर्शन थेट नोव्हेंबर महिन्यात पुढे ढकलण्यात आलंय.
‘सलार’ चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. चित्रपट प्रदर्शनासाठी महिना उरलेला असताना टीमनं प्रमोशन सुरू केलं नाही. ‘सलार’ चित्रपटाचा ट्रेलर ही प्रदर्शित करण्यात आला नाही. चित्रपट नक्कीच पुढे ढकलला जातो आहे अशा चर्चा रंगू लागल्या. चित्रपट व्यापार तज्ञ तरण आदर्श यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. सलार सिनेमा येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. चित्रपट प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं तरण आदर्श यांनी सांगितलं. सिनेमा प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. जवान चित्रपटाची क्रेझ पाहता निर्मात्यांनी आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली.
हे ही वाचा 
प्रभासचे सलग तीन चित्रपट दणाणून आपटले. ‘साहो’,’ राधेश्याम’,’आदीपुरुष’ चित्रपटांना फारसं यश लाभलं नाही. निर्मात्यांना ‘सलार’ चित्रपटाबाबत चिंता लागून राहिली आहे. शाहरुखची क्रेझ पाहता प्रभासचा ‘सलार’ चित्रपटाला अल्प प्रतिसाद मिळेल, या भीतीनेच निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकललं, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी