27 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमनोरंजनPradeep Patwardhan passed away : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

Pradeep Patwardhan passed away : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपट सृष्टीतील दिलखुलास आणि हसरे व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आज (ता. ९ ऑगस्ट) अखेरचा विश्वास घेतला.

मराठी चित्रपट सृष्टीतील दिलखुलास आणि हसरे व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आज (ता. ९ ऑगस्ट) अखेरचा विश्वास घेतला. ते गिरगावमध्ये राहण्यास होते. प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण त्यांच्या कायमच्या एक्झिटमुळे मराठी मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने त्यांचे चाहते सुद्धा भावुक झाले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. प्रदीप पटवर्धन यांनी आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांनी त्यांच्या अभिनयातून त्यांचा एक वेगळा चाहत्यांचा वर्ग निर्माण केला.

प्रदीप पटवर्धन यांचे ‘मोरुची मावशी’ हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजले. त्यांची या नाटकातील ‘भैय्या’ नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ‘मोरुची मावशी’ या नाटकामुळे प्रदीप पटवर्धन यांना मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळाली. जी आजतागायत कायम आहे. त्यांच्या मोरुची मावशी या रंगभूमीवरील नाटकातील अभिनयामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकाचे त्यांनी दीड हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणविसांना शिवसेना आमदाराने फटकारले

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. रंगभूमीवर प्रदीप पटवर्धन यांचा जम बसण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्यास सुरु केले. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याशिवाय त्यांनी मराठीमध्ये छोट्या पडद्यावर सुद्धा काम केले होते.

मराठी चित्रपटांमध्ये प्रदीप पटवर्धन यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली. तसेच त्यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, एक शोध, वन टू थ्री फोर, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम या मराठी चित्रपटांत सुद्धा काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

एका हसऱ्या आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेकांशी चांगले नाते निर्माण केले होते. ज्यामुळे मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी