29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनप्राजक्ता माळी 'करोडपती'मध्ये 'बिग बीं'ना काय म्हणाली?

प्राजक्ता माळी ‘करोडपती’मध्ये ‘बिग बीं’ना काय म्हणाली?

‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर…

तर ही संधी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणार, हे काय सांगायला हवं का? अशीच संधी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची (Maharastrachi Hasyajatra) लोकप्रिय सूत्रधार प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिला मिळाली. ती ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना काय म्हणाली हे तुम्हाला ठावूक आहे का? ते तर तुम्हाला आम्ही सांगूच पुढे पण, त्यांची भेट कुठे झाली, हे ऐकण्याचीही उत्सुकता तुम्हाला असेल की! तर प्राजक्ता माळी आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये. नाही नाही… प्राजक्ता करोडपती होण्यासाठी खेळत नव्हती तर कुणाच्या तरी प्रेमामुळे या खेळात सहभागी झाली होती. आता तुम्ही विचाराल ‘तो’ आहे तरी कोण? तर जरा धीर सांगतो सर्वकाही विस्ताराने!

तर झालं असं की, अजय नावाचा एक स्पर्धक ‘कौन बनेगा करोडपती’च्या (Kaun Banega Crorepati) सेटवर बच्चन साहेबांसमोर बसला होता. आणि त्यानं त्याची लाडकी अभिनेत्री प्राजक्त माळी हिच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय विचारता राव, ‘बिग बीं’चा (Big B) शो त्यात प्राजक्ताला व्हिडीओ कॉलचं आमंत्रण म्हटल्यावर ती नाही कशाला म्हणेल! तिला अजयनं पहिला प्रश्न विचारला, की योग, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, हे सगळे कसे मॅनेज करता? त्यावर प्राजक्तानं उत्तर दिलं… योग आणि कामाची आवड असेल तर अशक्य काहीच नाही.

त्यानंतर तिनं थेट अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. त्यात ती ‘बिग बीं’ना अमितजी म्हणाली. अमिताभ बच्चन यांचं अनेक चित्रपटांमध्ये अमित हे नाव आहे. शिवाय त्यांना अनेकजण अमितजी असंही म्हणतात. प्राजक्तानं नेमका तोच धागा पकड़ून त्यांना अमितजी म्हणत संवाद साधला. एवढंच नाही तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसोबत तुम्ही संवाद साधला होता, याचीही आठवण करून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्राजक्ता माळीला खूप गोड आशीर्वाद दिला. ते म्हणाले ‘तुमची अशीच प्रगती होवो!’

हे ही वाचा

‘गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट’

विराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

‘देवी’च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

या शोमध्ये व्हिडीओ कॉलमुळे सहभागी झाल्याचा आनंद प्राजक्ताच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यावर तिनं म्हटलंय की, ‘या कार्यक्रमात सहभागी होईन, असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते; Fans are one of the strongest pillars of my life.🎯 And see, that’s so true.☺️ हे अजयमुळे ते शक्य झालं.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी