28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमनोरंजन'एका गाण्याचा तिसरा भाग' प्रशांत नाकतीने घातलाय युट्यूबवर धुमाकूळ

‘एका गाण्याचा तिसरा भाग’ प्रशांत नाकतीने घातलाय युट्यूबवर धुमाकूळ

‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणारा संगीतकार प्रशांत नाकती (Prashant nakti) पुन्हा एकदा एक धमकेदार गाणं घेऊन आलाय. मराठी संगीत सृष्टीत पहिल्यांदाच कोणत्यातरी अल्बमच्या गाण्याचा तिसरा भाग प्रदर्शित होत आहे. याआधी ‘मी सिंगल’ आणि ‘माझी जानू’ यानंतर तिसरा भाग म्हणजेच ‘हर्टब्रेक झाला’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आणि या गाण्याने तरुणाईला वेड लावले आहे. तुम्ही किंवा तुमच्या ग्रूपमधील कोणता मित्र किंवा मैत्रीण सिंगल आहे का? मग हे गाणं तुम्ही नक्की ऐका…!!

मराठी अल्बम सृष्टीत संगीतकार प्रशांत नाकती यांची ‘पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात. प्रशांतचे आधीची दोन्ही गाणी सुपरहिट झाली. आता त्याचा तिसऱ्या पार्टसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रामुख्याने यातील निक आणि रितेशचा रॅप ट्रेंडिंगवर आहे.

प्रशांत नाकती ‘हर्टब्रेक झाला’ या गाण्याविषयी सांगतो, “हर्टब्रेक झाला हे गाणं मी सिंगल या गाण्याचा तिसरा भाग आहे. मी सिंगल आणि माझी जानू या गाण्यांना भरभरून प्रेम मिळालं. खरतरं ही एक तिनं मित्रांची गोष्ट आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, गौरी पवार, सृष्टी आंबवले आणि स्नेहल लांघे हे कलाकार आहेत. प्रत्येकवेळी या दोन मुलांना मुलगी मिळत नाही. ते सिंगल राहतात. अशी एक धम्माल गोष्ट या तिन्ही गाण्यांमध्ये दिसून येते. हे गाणं केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे.”

पुढे तो सांगतो, “हे गाणं नाशिक येथे शुट झालं आहे. तीन दिवस हे शुटं होतं. शुटींगच्या तिसऱ्या दिवशी निक आणि रितेशच्या फॅन्समुळे आम्हाला शुटिंग लोकेशन वरून लवकर निघालं लागलं. बाऊंसर असूनही प्रचंड गर्दी झाली. परंतु सगळ्यांनाच शुट करताना मजा आली. अभिजीत दानी यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. मी आणि संकेत गुरव आम्ही दोघांनी या गाण्याचं संगीत केलं आहे. या गाण्याची खास गोष्ट अशी की आम्ही पहिल्यांदाच या गाण्यात रॅप केला आहे. ‘ट्रेंडींग चल रहा है’ असं या रॅपचं नावं आहे. हा रॅप निक शिंदे आणि रितेश कांबळेनेच गायला आहे.”

संगीतकार प्रशांत नाकतीच्या ‘मी सिंगल’ अल्बमच्या चौथ्या भागात निक आणि रितेशला मुलगी भेटणारं का ? की ते सिंगलच राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं!!

हे सुद्धा वाचा : 

PHOTO नेहा महाजनचा गॉर्जियस लुक; गडद अंधार चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन आंबात दिग्दर्शित ‘रूपाचं चांदणं, नाखवा’नंतर आता ‘सपान’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी