22 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमनोरंजनअखेर प्रियांकाने दाखवला लेकीचा चेहरा; कुणासारखी दिसतेय पाहा बेबी जोनस

अखेर प्रियांकाने दाखवला लेकीचा चेहरा; कुणासारखी दिसतेय पाहा बेबी जोनस

अनेकदा चर्चेत असलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. तिची लेक मालती मेरी (Malti mary) नुकतीच एक वर्षाची झाली आहे. त्यात प्रियांकाने पहिल्यांदाच लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. प्रियांकाने वर्षभर आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. मात्र, आता स्वतः प्रियांकाने एक व्हिडीओ शेअर केला असून, यात मालतीची झलक पाहायला मिळाली आहे. हॉलिवूडच्या एका कार्यक्रमात प्रियांकाच्या लेकीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले. (Priyanka Finally showed her daughter’s face)

प्रियांकाचा पती निक जोनस (Nick Jonas) गायक आहे. जोनस ब्रदर्स (Jonas Brothers) नावाने हे जोनस भावंडं लोकप्रिय आहेत. जोनस ब्रदर्सचा नुकताच हॉलिवुडच्या वॉक ऑफ फेम(The Hollywood Walk of Fame)मध्ये समावेश झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व तिघे जोनस भाऊ त्यांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते. तेव्हा प्रियांका चोप्राच्या कडेवर असलेल्या मालती मेरीचा चेहरा सर्वांना दिसला. निक जोनास स्टेजवरुन पत्नी प्रियांका आणि लेक मालती साठी आपल्या भावना व्यक्त करत होता. तेव्हा प्रियांका कौतुकाने बघत होती. यादरम्यान शेअर केलेल्या एका व्हिडीओत मालतीची झलक दिसली आहे. पांढरा टॉप, क्रीम स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये मालती मेरी खूपच क्यूट दिसत होती. प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालती हिच्या पहिल्या पब्लिक अपिअरन्सबद्दल खूप उत्सुक होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

दरम्यान प्रियांका लेकीला तिचे बाबा स्टेजवर असल्याचे दाखवते आणि निक स्टेजवरूनच मालती मेरीकडे हात करतो. या क्यूट व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी मालती मेरी ही अगदी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजेच निक जोनास सारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : ऐश्वर्या रायला नोटीस

PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत

PHOTO : गुगलवर 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या १० व्यक्ती; एकनाथ शिंदे कितव्या स्थानी?

२०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच ती एक वर्षाची झाली. काही दिवसांपूर्वीच व्होग मासिका (vogue)ला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राने तिने बाल जन्माला घालण्यासाठी सरोगसीची मदत का घेतली, याचा खुलासा केला आहे. यापूर्वी नेहमीच प्रियांकाने मालतीचा चेहरा लपवला होता. मात्र आता तिचा चेहरा अखेर दिसला आणि चाहते भलतेच खूश झालेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी