साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा 2: द रुल’च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रुल’ ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. (pushpa 2 the rule new release date out)
‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री
या चित्रपटाचे टिझर आणि गाणे रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या मेगा एन्टरटेनरच्या रिलीजची वाट पाहत आहेत. यापूर्वी हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता पुष्पा 2 ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (pushpa 2 the rule new release date out)
पुष्पा 2: द रुलच्या निर्मात्यांनी अलीकडेच अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाचे एक रोमांचक पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन पुष्पाच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची नवीन रिलीज डेटही जाहीर केली आहे, त्यानुसार प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या रिलीजसाठी फक्त 75 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (pushpa 2 the rule new release date out)
धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
View this post on Instagram
पोस्टर रिलीज करताना लिहिले होते, ’75 दिवसांत, जगाला पुष्पा आणि त्याची अतुलनीय कमाल मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल. पुष्पा 2 द रुल भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा आणि अभूतपूर्व अध्याय लिहिणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.’ (pushpa 2 the rule new release date out)
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द राइज’ 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या रिलीजची वाट पाहू लागले. (pushpa 2 the rule new release date out)
आता, पुष्पा: द राइजच्या रिलीजच्या 3 वर्षांनंतर, त्याचा दुसरा भाग थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पुष्पा 2 हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी उत्सुकता आहे. (pushpa 2 the rule new release date out)