27 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजन'क्वीन' कंगना कधी बनली 'प्लॉप क्वीन'? आता देवदर्शनाचा सपाटा

‘क्वीन’ कंगना कधी बनली ‘प्लॉप क्वीन’? आता देवदर्शनाचा सपाटा

कंगना रणौत (Kangana Ranaut) म्हणजे एके काळजी बॉलीवूडची ‘क्वीन’ (bollywood queen). तिच्या अभिनयातील जादूमुळे चित्रपटाचा नायकही तिच्यापासून दोन फूट दूर राहायचा. हीरो कुणीही असो, चर्चा कंगनाच्या अभिनयाचीच व्हायची. पण काय झालं कळलं नाही, कंगना रणौतनं राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केली, वादग्रस्त वक्तव्ये सुरू केली. त्यानंतर ती क्वॉन्ट्रोक्वीन (controqueen) म्हणून ओळखू जायला लागली. आणि त्यानंतर तिच्या चित्रपटांची अपयशाची मालिका सुरू झाली. नुकताच कंगनाचा नायिकाप्रधान ‘तेजस’ चित्रपट सुपरड्युपर फ्लॉप झाला. त्यामुळे कंगना निराश झाली आहे. आणि त्यानंतर तिनं थेट देवदर्शनाचा सपाटा लावला आहे. अशीही चर्चा आहे की, कंगना महाभारतील पांडवांप्रमाणे विजनवासात जाणार आहे. आता खरं खोटं कंगनाच जाणे. पण एवढं मात्र खरं की, कंगनाचा मोठ्या पडद्यावरील करिश्मा कमी झाला आहे.

गेल्या आठवड्यात कंगनानं देवदर्शनाची ट्रिप काढली होती. तिनं द्वारकाधीशाचं (dwarakadhish) दर्शन घेतलं आणि मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं सोमनाथाचंही दर्शन घेतलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

यावेळी द्वारकेला बोटीतून जाताना कंगना रणौतचा व्हिडीओ खूप काही सांगून जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

खरं तर २०१३ मध्ये कंगनाचा ‘क्वीन’ चित्रपट झळकला. त्यानंतर कंगनाच्या अभिनयाची जादू सर्वत्र दिसू लागली. पुढे तिचे अनेक चित्रपट हिट, सुपरहिट झाले. २०१९ मधील मणिकर्णिका हा चित्रपटही गाजला. त्यानंतर तिनं राजकीय वक्तव्य करायला सुरुवात केली आणि तिच्या चित्रपटांना उतरती कळा लागली. तिचे चित्रपच एका पाठोपाठ एक फ्लॉप (flopqueen) होऊ लागले. अभिनेत्याने नेता होण्याचा प्रयत्न करू नये, ते सर्वांनाच जमतं असं नाही, असे अनेक प्रकारे तिला सूचित करण्यात आलं होतं. पण कंगना राजकारणापासून दूर व्हायला तयार नव्हती.

हे ही वाचा

मलायका अरोरा… आईच्या भूमिकेत

…अन् प्राजक्ता माळीला देव पावला!

नवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

अखेर प्रेक्षकांनी तिला दूर लोटल्याचं चित्र दिसू लागलंय. मधल्या काळात कंगनाचे रिवॉल्वर रानी, उंगली, आय लव न्यूयॉर्क, कट्टी बट्टी, रंगून, सिमरन, जजमेंटल है क्या हे चित्रपट कधी आले आणि गेले कळलेच नाही. २०२१ मधील थलायवी हा जयललिता यांच्या जीवनपटावरील चित्रपटही फ्लॉप (flop films) झाला. ‘धाकड’चीही अवस्था काही वेगळी झाली नाही. त्यामुळे कंगनानं थेट देवालाच साकडं घालायचं, असं बहुतेक ठरवलेलं दिसत आहे. वास्तविक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंगनाच्या ‘तेजस’मधील भूमिकेचं खूप कौतुक केलं. पण त्याचा प्रेक्षकांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळेच देवदर्शनानंतर आत्मा आणि मन शांत झालेल्या कंगना रणौतचे पुढील चित्रपट हिट होणार का, हे येणारा काळच ठरवेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी