30 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमनोरंजनपरिणीती सोबत लग्नाबाबत राघव चड्ढाने सोडलं मौन!

परिणीती सोबत लग्नाबाबत राघव चड्ढाने सोडलं मौन!

अभिनेत्री परिनीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. याबद्दल दोघांनीही अद्यापही प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही. एका मुलाखतीत राघव चडढा यांना विचारलं असता लग्नाबाबत आपण लवकरच अधिकृतरित्या माहिती देऊ, असं पत्रकारांना आश्वासन दिलं. येत्या २३ किंवा २४ तारखेला दोघंही विवाहबद्ध होत असल्याची चर्चा आहे.
गेल्या दहा दिवसांपासून ३० सप्टेंबर रोजी चंडीगढ येथे परिनीती चोप्रा आणि राघव चडढा यांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय. रिसेप्शनचं कार्ड सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. ऑगस्ट महिन्यात या दोघांनीही मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकाली मंदिरात एकत्र पूजा केली. त्यामुळे दोघांची लग्नघटिका जवळ आल्याच्या चर्चाना उधाण आलं.
एप्रिल महिन्यात परिनीती चोप्रा आणि राघव चडढा यांचा दिल्लीत साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याला आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच इतर राजकीय नेत्यांननीही हजेरी लावली होती.
युट्युबर रणवीर अल्लाबदियाच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राघवने परिणीतीला भेटण्याचा त्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “देवानं परिणीतीला माझ्या आयुष्यात दिल्याबद्दल खूप आभार. आमचं प्रेम सहज घडलं. आमच्या नात्यात कुठेही बडेजाव नाही.”
हे ही वाचा 
आठवड्यावर लग्नघटिका जवळ आल्यानं सगळीकडे दोघांनाही लग्नाच्या तारखेबाबत विचारणा होत आहे. परिणीतीने मोठ्या शिताफीनं आतापर्यंत लग्नाबाबतच्या प्रश्नांना टाळलंय. राघवनं लग्नाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगत असला तरीही आता दिवस किती उरलेत, तारीख जाहीर करायला दोघंही वेळ का घेत आहेत असा प्रश्न नेटीझन्सनी विचारला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी