25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमनोरंजनराज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला पोर्नोग्राफी प्रकरणात दिलासा

राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला पोर्नोग्राफी प्रकरणात दिलासा

राज कुंद्रासह या प्रकरणातील उमेश कामत, अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांना देखील सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रा याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रासह या प्रकरणातील उमेश कामत, अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांना देखील सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांना अटक होणार नाही. या सर्व आरोपींवर अश्लिल व्हिडीओ व्हायरल करत असल्याचा आरोप होता. सर्व आरोपींनी तपासात सहकार्य करावे आणि गरज पडल्यास तपासात सहभागी व्हावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.


मंगळवारी (13 डिसेंबर) रोजी, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने निकाल देताना, सर्व आरोपींना या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ शकतो असे आमचे मत असल्याचे म्हटले होते.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्यावर 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. राज कुंद्रा यांनी मुंबईच्या आसपास असलेल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अश्लील व्हिडीओ शुट केले आणि नंतर ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. राज कुंद्राने हा सौदा कोट्यवधी रुपयांमध्ये  केला होता.

हे सुद्धा वाचा
दीपाली सय्यद आता चित्रपटनिर्मितीत; ‘संत मारो सेवालाल’च्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

“भुरा”कार शरद बाविस्कर यांनी नाकारला राज्य सरकारचा वाङमय पुरस्कार; “फ्रॅक्चर्ड फ्रीडम”बाबत हुकूमशाही सरकारी मनमानीविरोधात सम्यक भूमिका!

25 नोव्हेंबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने 2020 मध्ये पॉर्नोग्राफिक सामग्रीच्या कथित वितरणासाठी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गन्ह्याशू संबंधित प्रकरणात राज कुंद्रा याची अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका फेटाळली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटण्यापूर्वी कुंद्राने त्याने जवळपास तीन महिने न्यायालयीन कोठडीत घालवले होते.पोर्नोग्राफी आणि स्ट्रीमिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून जुलै 2022 मध्ये राज कुंद्रा याला अटक करुन गुन्हा दाखल केला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!