28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनRaju Shrivastav Update : राजू श्रीवास्तव बरे होत आहेत, डाॅक्टरांकडून आली मोठी...

Raju Shrivastav Update : राजू श्रीवास्तव बरे होत आहेत, डाॅक्टरांकडून आली मोठी अपडेट

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांनी ते उत्तमरीत्या प्रतिसाद देत आहेत. अजूनही राजू व्हेन्टिलेटरवर असून डॉक्टरांची त्यांच्यावर २४ तास देखरेख सुरू आहे. यावेळी राजू बरे होतीलस परंतु थोडी वाट पाहावी लागेल असे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

लोकप्रिय काॅमेडिअन राजू श्रीवास्तव जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना त्यांना हार्टअॅटॅक आला आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आणि ते थेट कोमातच गेले. दरम्यान त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून राजू श्रीवास्तव बरे होत असल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले आहे. राजू हे गेल्या 10 ऑगस्टपासून व्हेंटिलेटवरच आहेत, जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हाच राजू यांचा ब्रेन डेड झाल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, गुणी कलाकारावर अचानकपणे झालेल्या या आघातावर चाहत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांना ते उत्तमरीत्या प्रतिसाद देत आहेत. अजूनही राजू व्हेन्टिलेटरवर असून डॉक्टरांची त्यांच्यावर 24 तास देखरेख सुरू आहे. यातून राजू बरे होतील परंतु थोडी वाट पाहावी लागेल असे डाॅक्टरांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी राजू यांच्या प्रकृतीबाबत खोटी माहिती पसरवू नये असे आवाहन सुद्धा केले आहे.

हे सुद्धा वाचा…

‘Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

Supriya Sule : सत्ताधाऱ्यांचे वर्तन महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Ajit Pawar :’पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा विरोधकांना झोंबल्या- अजित पवार

मागच्या आठवड्यात अभिनेता शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. ट्विटमध्ये शेखर म्हणाले होते की, ‘राजू यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सर्व अवयव काम करत आहेत. भले ही ते बेशुद्ध आहेत. परंतु डॉक्टरांच्या मते ते बरे होत आहेत. महादेवाची कृपा हरहर महादेव’ असे म्हणून राजू यांच्या चाहत्यांना त्यांनी खूषखबर दिली होती. राजू यांचा लहान भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सुद्धा याबाबत एक व्हिडिओ शेअर करून त्यांचा भाऊ लढवय्या आहे. तो लवकरच हे युद्ध जिंकून परत येईल आणि आपल्या विनोदानं सर्वांना खळखळून हसवेल असे म्हणून त्यांनी सुद्धा राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी