27 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeमनोरंजनComedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

आपल्या विनोदांनी सर्वांना हसवणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना काल (ता. १० ऑगस्ट) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या विनोदांनी सर्वांना हसवणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना काल (ता. १० ऑगस्ट) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव हे कॉमेडी क्षेत्रातील खूप मोठे नाव असून त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्यांच्या विनोदांवर लोक अक्षरश: पोट धरून हसतात. सध्या राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शारीरिक व्यायाम करत असताना ते ट्रेडमिलवर कोसळले. त्यानंतर त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव हे काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. दरम्यान, सकाळी ते राहत असलेल्या एका हॉटेलमधील जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवरून पडले. यावेळी त्यांना छातीत जोरदार वेदना होऊ लागल्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जिम ट्रेनरने राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांची एंजियोग्राफी करण्यात आली. यामध्ये त्याच्या हृदयात १०० टक्के ब्लॉक आढळून आले. सध्या राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परंतु अद्यापही त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव कामानिमित्त काही लोकांची भेट घेण्याकरिता दिल्लीला गेले होते.

हे सुद्धा वाचा

P L Academy Problem : पु. ल. देशपांडे अकादमीत पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, तरीही लाखोंची बिले!

Azadi Ka Amrit Mahotsav : राज्यपालांचा ‘अमराठी बाणा’, आधी ‘मराठी’ कलावंतांना डावलले, नंतर ‘अमराठी’ कार्यक्रमाचे थाटात उदघाटन केले !

Pradeep Patwardhan Passed Away : नाटकांमुळे प्रदीप पटवर्धन यांना गमवावी लागली होती बँकेतील नोकरी

गेल्या काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव हे आपल्या कामानिमित्त बाहेरच आहेत. नुकतेच ३० जुलैला ते एका शो मध्ये सुद्धा सहभागी झाले होते. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदांमुळे तर प्रसिद्ध आहेतच, पण ‘गजोधर भैय्या’ नामक ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शो मधील व्यक्तिरेखेमुळे ते खूप जास्त प्रसिद्ध झाले. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. आजवर राजू श्रीवास्तव यांनी ‘बिग बॉस ३’, ‘नच बलिये’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या छोट्या पडद्यांवरील कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमांमधून देखील त्यांनी लोकांची वाहवाह मिळविली आहे. सध्या लवकरात लवकर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बरी व्हावी, अशी प्रार्थना सर्वांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी