28 C
Mumbai
Monday, December 4, 2023
घरमनोरंजनराखी सावंतने केली बिग बॉसच्या घराची तोडफोड

राखी सावंतने केली बिग बॉसच्या घराची तोडफोड

राखी सावंत हिने मराठी बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात राडा घालण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी राखी सावंत घरातील इतर स्पर्धकांसोबत वाद घालताना दिसून आली.

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेले बिग बॉस मराठी हे सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. बिग बॉस मराठीचे हे चौथे पर्व आहे. या पर्वामध्ये अनेक नावाजलेले टीव्ही कलाकार सहभागी झालेले होते. परंतु नॉमिनेशमुळे अनेकांना लवकरच या शोमधून काढता पाय घ्यावा लागला. परंतु त्यांच्या असण्याने या शोला हवा तसा टीआरपी मिळत नसल्याने बिग बॉसकडून पुन्हा काही नवीन स्पर्धक शोमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये राखी सावंत, बिग बॉस मराठी तीनचा विजेता विशाल पाटील, बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आरोह वेलणकर यांना शोमध्ये सहभागी करून घेण्यात आले. परंतु आता सहभागी करण्यात आलेल्या माजी स्पर्धकांमधील राखी सावंत हिच्यामुळे मराठी बिग बॉसमधील सुरुवातीपासून घरात असलेले काही स्पर्धक चांगलेच रडकुंडीला आलेले दिसत आहेत. राखीच्या रोजच्या नव्या वादांमुळे घरातील स्पर्धक देखील त्रासलेले पाहायला मिळत आहेत.

राखी सावंत हिने मराठी बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात राडा घालण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी राखी सावंत घरातील इतर स्पर्धकांसोबत वाद घालताना दिसून आली. त्यानंतर तिचा राग अनावर न झाल्याने तिने थेट बिग बॉसच्या घरात राडा करत घरातील वस्तूंची तोडफोड केली. ज्यामुळे इतर स्पर्धक विरुद्ध राखी सावंत असे चित्र दिसून आले.

राखी सावंत हिने तिची घरातील कोणत्यातरी स्पर्धकाने कॉफी लपवल्यामुळे घरामध्ये धिंगाणा घातला. पण याच वेळेस घरातील स्पर्धक असलेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने याबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर राखी सावंत आणि अपूर्वामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाले. यावेळी रागाच्या भरात राखी ही अपूर्वा नेमळेकर हिच्या अंगावर धावून देखील गेली. त्यानंतर तिचा वाद घरातील स्पर्धक अक्षय आणि आरोह यांच्यासोबत देखील झालेला पाहायला मिळाला.

हे सुद्धा वाचा

अभिनेता मुकेश खन्नाची बेशरम रंग गाण्यावर संतापजनक प्रतिक्रिया

ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

‘ईडी’चे अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणी समन्स

राखी सावंत हिने घरातील सामानाची तोडफोड केल्यानंतर बिग बॉसने देखील याबाबत संताप व्यक्त केला. तसेच केलेल्या या घटनेचा विरोध करत राखी सावंतला शिक्षा देखील सुनावली. ज्यामुळे घरातील इतर स्पर्धा त्यांनी खुश होतो टाळ्या वाजवल्या. दरम्यान याआधी राखी सावंत ही सात ते आठ वेळा हिंदी बिग बॉसमध्ये देखील सहभागी झालेली आहे. ड्रामा क्वीन अशी ओळख असलेल्या राखी सावंतने हिंदी बिग बॉसला देखील चांगला टीआरपी दिलेला आहे. परंतु यंदा पहिल्यांदाच राखी सावंत मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याने या शोला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी