26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमनोरंजनराखी सावंतला पोलिसांनी अटक केली नाही कारण...

राखी सावंतला पोलिसांनी अटक केली नाही कारण…

एका मॉडेलचे आक्षेपार्ह भाषा वापरल्या प्रकरणी मुंबईतील आंबोली पलिसांनी ( Mumbai Police) गुरुवारी (दि. १९) रोजी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेतले होते. काल न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. मात्र दिवसभराच्या चौकशी नंतर राखीला सोडण्यात (released) आले. यावेळी तिच्यासोबत तीचा पती आदिल खान देखील होता. राखीने आज पोलिसांना चौकशीला सहकार्य केल्याचे देखील सुत्रांनी सांगितले. पण राखीला सोडण्याचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. फिर्यादीचे वकीलांनी सांगितले. ते म्हणाले, राखीच्या आईची प्रकृती गंभीर असल्यामुळे माणूसकीच्या नात्यातून राखीच्या अटकेसाठी आम्ही मागणी केली नाही. (Rakhi Sawant was released by the police after a day long interrogation)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राखीची चौकशी केल्यानंतर सायंकाळी तिला न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती. मात्र माणुसकीच्या नात्यातून तिची अटक थांबविण्यात आली. राखी सावंतच्या आईची प्रकृती सध्या गंभीर असून रुग्णालयात तिच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने तिच्या आईचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले, त्यावरुन तीच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येते त्यामुळे माणूसकीच्या नात्याने फिर्यादीच्या वकिलांनी तिच्या अटकेसाठी मागणी केली नाही. दरम्यान पोलिस चौकीतून राखी बाहेर पडल्यानंतर ती थेट आईला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली. यावेळी ती खुपच शांत असल्याचे देखील दिसून आले.

हे सुद्धा वाचा

राखी सावंतला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण

इस्लाम बदलणार की नाही? राखी सावंत धर्म बदलून फातिमा झाल्यानंतर तस्लीमा नसरीन यांचा संतप्त सवाल

राखी सावंतने केली बिग बॉसच्या घराची तोडफोड

दरम्यान राखीने आपला मोबाईल फोन पोलिसांकडे तपासासाठी दिला असून राखीने पोलिसांना चौकशीत दिवसभर सहकार्य केल्याचे देखील सुत्रांकडून कळाले. राखी सावंतच्या आईची प्रकृती सध्या गंभीर आहे. तिची आई असाध्य आजाराशी सामना करत आहे. शिवाय तिने चौकशीत देखील सहकार्य केल्यामुळे त्यामुळे तिच्या अटकेबाबत गंभीरतेने पाऊले उचलली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी