32 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमनोरंजनराणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या प्रसिद्धीस आलेली जोडी म्हणजे राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar). या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री लोकांच्या खूप पसंतीस उतरली होती. याच मालिकेमुळे राणा-अंजलीला एकत्र पाहणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत होतं. अशातच या दोघांनी खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला. दरम्यान, हे जोडपं आज लग्नानंतरचा आपला पहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करत आहेत. आज नुकतंच व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव करत हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. (Ranada and Pathak Bai’s first Valentine’s Day after marriage)

आज सर्वत्र व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातोय. काहीजण आज आपला पहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताहेत तर काहीजण अनेक वर्षांपासूनचे प्रेम नव्याने साजरा करीत आहेत. सगळीकडे प्रेमाचं वारं वाहताना दिसून येत आहे. त्यातच मराठी सेलिब्रेटी कपल अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे दोघेही लग्नानंतरचा आपला पहिलावहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करीत आहेत. नुकतेच अक्षयाने हार्दिकसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती हार्दिकसोबत रोमँटिक फोटो शेयर केला आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले पाहायला मिळत आहेत. या दोघांनी हातात एक गुलाबाचं फुलसुद्धा धरलं आहे. त्यामुळे हा फोटो आणखीनच आकर्षक दिसत आहे. दरम्यान, अक्षयाने फोटो शेअर करत एक सुंदर शायरीसुद्धा लिहली आहे, ‘मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना बस ये समझ लो, लफ्ज कम मोहब्बत ज्यादा!’. असं म्हणत अक्षयाने आपल्या मन की बात सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या निमित्ताने अक्षया आणि हार्दिक भेटले होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामधील राणा-अंजलीची केमिस्ट्री आणि त्यांचे डायलॉग्स लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मालिकेमध्ये हार्दिकने कोल्हापूरच्या रांगड्या पैलवानाची भूमिका साकारली होती. तर अंजलीने एका शहरातील व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा: PHOTO : रिंकू राजगुरु म्हणते; तुमचे हृदय सांगेल त्यावरच विश्वास ठेवा!

 अरेव्वा: केरळच्या नववधूने लग्नाच्या दिवशीच लॅबकोट घालून दिली परीक्षा..!

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

गेल्यावर्षी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या दोघांनी साखरपुडा करत सर्वांनाच चकित केलं होतं. साखरपुड्याच्या काही दिवसांनंतरच दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जात आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी