बॉलिवूडमध्ये यंदाचं वर्ष अॅक्शन चित्रपटांचं असणार आहे. सनी देओलचा ‘गदर’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला. आता मात्र रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत.
रणबीर मुळात रोमँटिक आणि विनोदी चित्रपटासाठी ओळखला जातो. तर टायगर श्रॉफ अॅक्शन चित्रपटात मास्तर आहे. टायगर तब्बल नऊ वर्षानंतर अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत झळकणार आहे. दोघांनीही पदार्पण चित्रपटानंतर पुन्हा एकत्र काम केलं नाही. गणपत चित्रपटानिमित्तानं दोघंही पुन्हा एकत्र दिसणार आहेत. टायगरचा गेल्या चार वर्षांत कोणताही चित्रपट यशस्वी झाला नाही. टायगरनं अभिनेता हृतिक रोशनसोबत २०१९ साली ‘वॉर’ चित्रपट केला. या चित्रपटानंतर टायगरचा एकही चित्रपट चालला नाही.
View this post on Instagram
दुसरीकडे बऱ्याच गॅपनंतर रणबीरचा गेल्या वर्षी ब्राह्मस्त्र चित्रपट प्रदर्शित झाला. आता वर्षभरनंतर येत्या १ डिसेंबर रोजी त्याचा ‘ऍनिमल’ चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची संपूर्ण टीम दक्षिणात्य चित्रपटातील आहे. ‘अर्जुन रेडी’ चित्रपट फेम संदीप रेडी ‘ऍनिमल’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर रश्मीका मंदना चित्रपटाची नायिका आहे. हा चित्रपट १०० टक्के हिट ठरेल अशी शक्यता चित्रपट समीक्षकानी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा
प्राजक्ता कोळीचं एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलं… चाहत्यांना दिली गोड बातमी
असं काय घडलं…. चित्रपट नयनताराचा चर्चा दीपिकाची!
अजय देवगणचा ‘सिंघम३’ येणार, अभिनेत्री कोण असणार ?
View this post on Instagram
मात्र २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या गणपत चित्रपटा बाबत चित्रपट समीक्षकानी शंका व्यक्त केली. चित्रपटातील नायक टायगर श्रॉफ आणि नायिका क्रिती सेनॉन या दोघांचेही चित्रपट चालत नाही. अशातच निर्मात्यानी दोघांनाही एकत्र चित्रपट घेतल्यानं चित्रपट यशस्वी ठरण्याबाबत शंका असल्याचं मत चित्रपट समीक्षकानी व्यक्त केलं.