30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनरश्मिका मंदानाच्या नावावर काय खपवलं पाहा, ती बिग बींना काय म्हणाली?

रश्मिका मंदानाच्या नावावर काय खपवलं पाहा, ती बिग बींना काय म्हणाली?

‘पुष्पा’मधील श्रीवल्ली… बस्स एवढे शब्द उच्चारले तरी समोर साक्षात रश्मिका मंदाना उभी राहते. आता तुम्ही म्हणाल, रश्मिकाला कोण ओळखत नाही! सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे. रश्मिका तिच्या अॅनिमल या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आहे. शिवाय जाहिरांतीमध्येही तिला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ती आता पब्लिक फिगर बनली आहे. खूप लोकप्रियता मिळाली की त्याचा गैरफायदा घेणारेही लोक असतात. असाच प्रकार रश्मिकासोबत घडलाय. या गैरप्रकारामुळे तिचे चाहतेही नाराज झालेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. आता काय घडलंय, हा प्रश्न विचारू नका, कारण आठवडाभर आपण पाहतोय रश्मिकाचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालवतोय. पण ती रश्मिका मंदाना नाही

आता आपण पाहुया रश्मिकाचा चेहरा असलेला व्हायरल झालेला व्हिडीओ

या व्हिडीओवरून टीकेचा आणि नाराजीचा धुरळा उडाल्यानंतर लक्षात आले की मूळ व्हिडीओ झारा पटेल हिचा आहे. झारा पटेल सोशल इ्न्फ्लूएन्सर असून ती कायम चर्चेत असते. आता डीपफेकच्या माध्यमातून तिचा व्हिडीओवर म्हणजे चेहऱ्यावर रश्मिकाचजा चेहरा इतका बेमालूम मॉर्फ केलाय की ती झारा पटेल आहे, हे पटकन लक्षात येत नाही.

आता आपण प्रथम रश्मिकाच्या नावावर खपवलेला आणि नंतर मूळ झारा पटेलाचा व्हिडीओ पाहू

हे प्रकरण खूप गंभीर आहे. या पद्धतीने व्हिडीओ मॉर्फ झाले तर खरी ओळख नाहीसी होण्याचीच जास्त भीती आहे. त्यामुळे यावर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला बिग बी अमिताभ बच्चन यांनीही दिला आहे.

हे ही वाचा

श्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?

तुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?

दिशा पटाणीला नक्की काय सांगायचं आहे?

आता एवढे महाभारत झाल्यानंतर रश्मिका मंदाना अभिनय क्षेत्रातील भीष्माचार्य अमिताभ बच्चन यांचा सल्ला ऐकणार, की कानाडोळा करून पुढे जाणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, रश्मिकाने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

तुमच्यासारख्या नेतृत्वामुळे या देशात मला देशात सुरक्षित वाटते, या शब्दांत रश्मिकाने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी