31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमनोरंजनसरसेनापती प्रतापराव गुजरांची गौरवगाथा उलघडणार; ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

सरसेनापती प्रतापराव गुजरांची गौरवगाथा उलघडणार; ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीत आणखी एका ऐतिहासिक सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे.

मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक सिनेमे तयार करण्याचे सत्र सुरू आहे. महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर आधारित सिनेमे ही प्रत्येक वयोगटातील रसिकांसाठी पर्वणी आसते. त्यामुळेच गेल्या काही काळात तयार झालेल्या ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांची गर्दी लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. अशांतच आता मराठी सिनेसृष्टीत आणखी एका ऐतिहासिक सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे.

रावरंभा चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे?,कोण कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या !, कोर्टाने दिला मोठा निर्णय

आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचे पाप कुणाचे, आता होणार ‘न्याय’

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते” अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसतायेत. शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत. अशोक समर्थ यांनी याआधी मराठीमधील बेधडक, आसरा यांसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंघम आणि रावडी राठोड यांसारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

या पोस्टरवरून ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती पहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. शिवाय या सिनेमात आणखी कोणकोणते दिग्गज अभिनेते भुमिका साकारणार आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत कोण आपल्या अभिनयाची ताकद आजमावणार आहे यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!