31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमनोरंजनअरे, हे काय? सुशांत सिंग राजपूतला विसरली रिया चक्रवर्ती, सलमानशी खास नाते...

अरे, हे काय? सुशांत सिंग राजपूतला विसरली रिया चक्रवर्ती, सलमानशी खास नाते असलेल्या, सोनाक्षी-सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडशी करतेय डेट!

 

दुर्दैवी अभिनेता सुशांत सिंग राजपूत अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या न्यायासाठी ते आजही ट्विटरवर ट्रेंड चालवत आहेत; पण सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया चक्रवर्ती मात्र त्याला विसरली आहे. आता ती सुष्मिता सेन, सोनाक्षी सिन्हाचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या बंटी सजदेहशी डेट करु लागली आहे. तो रिअॅलिटी शोजमधील स्टार स्पर्धक आहे. या बंटीचे सलमानशी खास नाते आहे.

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर 2020 पासून रिया चक्रवर्ती ही अभिनेत्री वादात सापडलेली होती. त्यातून सावरत तिने आता नवा जोडीदार मिळविला आहे. रिया सध्या बंटी सजदेहला डेट करत आहे. तिचा नवा बॉयफ्रेंड बंटी सजदेह हा फॅशन डिझायनर असून मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही तो सक्रीय असतो. एका बड्या टॅलेंट मॅनेजमेंट फर्मचे तो संचालन करतो. सलमानचा भाऊ, सोहेल खानची एक्स वाईफ असलेल्या सीमा सजदेहचा हा बंटी भाऊ आहे.

बंटी सजदेह आणि रिया चक्रवर्ती गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. रिया त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट फर्मसोबत काम करायची. 2021 साली ‘चेहरे’ या चित्रपटात रिया चक्रवर्ती चमकली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर, रिया चक्रवर्ती सुरुवातीला आरोपी म्हणून पोलिस कोठडीत होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत रियाला अनेक तपास यंत्रणांच्या चौकशील सामोरे जावे लागले. या कठीण दिवसात प्रत्येक टप्प्यावर बंटीने रियाला साथ दिली. त्याचीही तपास यंत्रणांनी चौकशी केली. ला पोलिस कोठडीत अनेक चौकशींना सामोरे जावे लागले.

हे सुद्धा वाचा : 

सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; न्याय : द जस्टिस; हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

सुशांतसिंग चित्रपट सृष्टीतील वर्ग संघर्षाचा बळी

आधीची ओळख असली तरी बंटी आणि रियाने या वर्षीच्या सुरूवातीपासूनच डेट करण्यास सुरुवात केली. नुकतीच ती बंटीच्या बर्थडे पार्टीतही दिसली होती. रियासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी बंटीचे लग्न झालेले होते. अर्थात, गर्लफ्रेंड अंबिका चौहानसोबत गोव्यात केलेले लग्न मोडून त्याने घटस्फोट घेतला आहे. यापूर्वी सुष्मिता सेन, नेहा धुपिया, सोनाक्षी सिन्हा आणि दिया मिर्झासोबतही बंटी सजदेहचे नाव जोडले गेले आहे.

Rhea Chakraborty Dating, Bunty Sajdeh, Sushant Singh Rajput

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!