2023 हे रिद्धी डोगरा यांच्यासाठी रोमांचक वर्ष असणार असून अनेक मोठे प्रोजेक्ट्स रिलीजच्या जवळ आहेत. रिद्धी डोगराने टेलिव्हिजन उद्योगात उल्लेखनीय काम केले आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक मनोरंजक प्रकल्पांसह भारतीय कुटुंबांचे मनोरंजन केले आहे. अशातच, आता रिद्धी डोगरा ऍटली कुमार दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनीत ‘जवान’ तसेच ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. रिद्धी यांनी ‘मॅरिड वुमन’ आणि ‘असुर’ यांसारख्या हिट मालिकांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये, त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. अशातच, आता ‘जवान’ आणि ‘टायगर 3’द्वारा दर्शकांच्या भेटीला येण्यासाठी रिद्धी डोगरा सज्ज असतानाच, त्यांनी 2023 ची वाट कशी आहे हे उघड केले आहे. त्याबद्दल बोलताना रिद्धी डोगरा म्हणाली, “येत्या वर्षासाठी मी खूप उत्सुक आहे कारण मी काही अप्रतिम कलाकारांसोबत आणि कथेत काम केले आहे. काही खरोखरच रोमांचक कथा असणारे प्रकल्प आहेत.”
त्यांच्या सहकलाकारांबद्दल पुढे बोलताना रिद्धी म्हणाली, “ते खूप छान आणि विनम्र सहकलाकार आहेत. जेव्हा त्यांच्या क्राफ्टची गोष्ट येते तेव्हा त्यांच्यात एक गोष्ट सामान्य असते. प्रत्येक सेटवर आणि विशेषतः शाहरुख खानसोबत ‘जवान’मध्ये काम करताना आरामदायक वातावरण होते. जे कोणी मला ओळखतात त्यांना माहीत आहे की मी त्यांची किती मोठी चाहती आहे. मी त्यांना एडमायर करत मोठी झाली आहे आणि त्याहीपेक्षा एक अभिनेता म्हणून. सेटवर त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणे, त्यांच्यासोबत शूटिंग करणे, त्यांच्यासोबत दृश्यांवर चर्चा करणे हा एक चांगला अनुभव होता. मी हे आदराने सांगते की माझ्या आयुष्याचे दोन भाग आहेत, पहिला शाहरुख खानसोबत शूटिंग करण्यापूर्वीचा आणि दुसरा शूटिंगनंतरचा. शिवाय, ते दिल्लीचे असल्यामुळे मला त्यांच्या आसपास आणि त्यांच्याशी बोलण्यात सहजता जाणवली. त्यांचा सेंस ऑफ ह्यूमर दिल्लीकरांइतकाच वेगळा आहे, तसेच त्यांच्या उपस्थितीत आपल्याला सहज करण्याची त्यांची पद्धत आहे.”
हे सुद्धा वाचा
VIDEO: मुंबई अहमदाबाद मार्गावर पाऊस!
हिवाळी अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!
रिझर्व बँकेने 13 कॉर्पोरेट बँकाना ठोठावला मोठा दंड
रिद्धी डोगरा ‘लकडबग्घा’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच, एका सामान्य मुलाची बेकायदेशीर पशू व्यापार उद्योगाविरुद्ध लढण्यावर हि कथा आधारित आहे. याशिवाय, वर्क फ्रंटवर, रिद्धी डोगरा ‘पिचर्स 2’, ‘जवान’ आणि ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे.