29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमनोरंजनRiddhi Dogra : 'टायगर ३'नंतर रिद्धी डोगरा दिसणार शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये

Riddhi Dogra : ‘टायगर ३’नंतर रिद्धी डोगरा दिसणार शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये

रिद्धी डोगरा शाहरुख खानच्या 'जवान'या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. विजय सेतुपती, नयनतारा सारखे भारतातील दिग्गज अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार असून, रिद्धी डोगरा देखील चित्रपटाचा मुख्य भाग असल्याचे सांगितले जाते.

ऍटली कुमारच्या दिग्दर्शनाची घोषणा झाल्यापासून, चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. ‘जवान’या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगात असतानाच, चित्रपटात पाहायला मिळणाऱ्या कलाकारांमध्ये आता भर पडली आहे, कारण आता रिद्धी डोगरा शाहरुख खानच्या ‘जवान’या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. विजय सेतुपती, नयनतारा सारखे भारतातील दिग्गज अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार असून, रिद्धी डोगरा देखील चित्रपटाचा मुख्य भाग असल्याचे सांगितले जाते. ‘मॅरिड वुमन’ आणि ‘असुर’ यांसारख्या ओटीटी शोजमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली रिद्धी डोगरा ‘जवान’च्या कलाकारांमध्ये सामील झाल्याचं कळतं. ती महत्त्वाची भूमिका साकारणार असून, अधिक तपशील सस्पेन्स राखण्यासाठी गुपित ठेवण्यात आले आहे. रिद्धी डोगरा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसणार असून, तिने आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे असूर मधील रिद्धीच्या भुमिकेने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली होती. त्यानंतर तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशांतच आता ती एकाच वेळी बॉलिवूडमधील नामांकित अशा दोन खान अर्थात सलमान खान आणि शाहरुख खान या दोन मोठ्या स्टार्स सोबत एका सिनेमात काम करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले भिकार****

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra News : भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्याचा भीषण अपघात

एका सूत्राने खुलासा केला की, “रिद्धी डोगरा यांनी यापूर्वीच मुंबई आणि चेन्नईमध्ये जवानासाठी शूटिंग केले आहे. ती एक प्रतिभावान कलाकार आहे आणि तिने या चित्रपटात कौतुकास्पद काम केले आहे. तिला एका नव्या व्यक्तिरेखेत पाहणे कौतुकास्पद ठरेल.”त्यामुळे ाता आगामी काळात रिद्धा आपल्या चाहत्यांसाठी काय मोठं सरप्राईज घेऊन येणार आणि या दोन्ही सिनेमात तिची भुमिका काय आणि कशी असणार ाहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहयला मिळत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!