मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिचे भारतीय पेहरावातील फोटो आणि टपोरे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालतात. सैराट चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली ‘आर्ची’ तिच्या साडीच्या स्टाईलमुळे देखील प्रसिद्ध आहे.
रिंकू राजगुरुने सोशल मिडीयावर तिचे काळ्या रंगातील दाक्षिनात्य पेहरावातील साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.
रिंकू राजगुरुने फोटोंसोबत ”होठों ने सब बातें छुपा कर रखीं आँखो को ये हुनर कभी आया ही नहीं…” ही शायरी कॅप्शनमध्ये लिहीली आहे. तिच्या या शायरीने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे.
केसात मोगऱ्याचा गजरा, कानात झुमके आणि केसांची बट हलका फुलका मेक-अप केलेला रिंकू चा लुक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अनेक कमेंट्स केलेल्या आहेत.
इस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंना सात तासांमध्ये जवळपास 45 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्स देखील केलेल्या असून तीचा हा साधा लुक आवडल्याचे देखील म्हटले आहे.
रिंकू सोशल मीडियावर अनेकदा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत असते. त्या फोटोंना ती हटके कॅप्शन देखील देते. आजच्या पोस्टमध्ये तीने हिंदीतील प्रसिद्ध गीतकार गुलझार यांच्या ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है’ या गाण्यातील दोन ओळी कॅप्शनमध्ये दिल्या आहेत.
रिंकू राजगुरुने नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटानंतर या चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात तिने भूमिका केली होती. तसेच ओटीटीमाध्यमामावरील काही वेबसिरीजमध्ये दिखील तीने अभिनय केला आहे.
हे सुद्धा वाचा
बीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी
१ कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी; विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढणार
पुराचे पाणी घरात घुसुन नुकसान झालेल्या कुटुंबांना दहा हजारांची नुकसान भरपाई -उपमुख्यमंत्री अजित पवार