30 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमनोरंजनरितेश देशमुखच्या 'वेड' ने कमावले इतके कोटी; तिकीटबारीवर तुफान प्रतिसाद

रितेश देशमुखच्या ‘वेड’ ने कमावले इतके कोटी; तिकीटबारीवर तुफान प्रतिसाद

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या प्रमुख भूमिका असलेला वेड (Ved) चित्रपट अक्षरश: तिकीटबारीवर धुमाकुळ घालत आहे. सलग दोन आठवडे चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलच्या पाट्या लागल्या आहेत. चित्रपटाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रेक्षकांची धावपळ उडत असल्याचे चित्र महाराष्ट्रभरात दिसत आहे. सलग दोन आठवड्यानंतर देखील चित्रपटाला तुफान प्रतिसाद लाभत आहे.  (Riteish Deshmukh’s film ‘Ved’ Collect 33.42 crores)

रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून जेनेलिया देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी (३० डिसेंबर) वेडने तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर आठवडाभर चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच असून प्रेक्षकांची अफाट गर्दी चित्रपटगृहांबाहेर होत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत (दि.६) रोजी वेड चित्रपटाची एकुण कमाई तब्बल २३ कोटी १९ लाख रुपयांची झाली होती. त्यांनंतर शनिवारी आणि रविवारी देखील चित्रपट पाहण्यासाठी तुडूंब गर्दी झाली. अनेकांना तर तिकीट न मिळाल्याने परत फिरावे लागल्याच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.आतापर्यंत दहा दिवसांमध्ये (दि. ८ जानेवारी ) ३३. ४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  रविवारी एकाच दिवसात ५ कोटी ७० लाख रुपयांची कमाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

वेड चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहून रितेश देशमुखने प्रेक्षकांचे आभार मानत तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या असे म्हणत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे.

ग्रामीण भागात देखील तुफान कमाई  
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून देखील चित्रपटाला उच्चांकी कमाई मिळत आहे. अकलूजमध्ये रविवारी (दि. ८) रोजी एकादिवसात ३ लाख ४० हजार ५५० रुपयांची कमाई करत चित्रपटाचे गेल्या रविवारचे रेकॉर्ड तोडले. गेल्या रविवारी अकलूजमध्ये वेड चित्रपटाने ३ लाख २५ हजार रुपयांची कमाई केली होती. वेड चित्रपटाची अकलूज मधील ही कमाई बाहूबली-२ ला देखील मागे टाकणारी ठरली. बाहूबली -२ ने अकलूजमध्ये १ लाख ८२ हजार रपयांची कमाई केल्याचे ट्विट रितेश देशमुखच्या एका चाहत्याने केले असून रितेश देशमुख याने देखील ते ट्विट रिट्विट केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी