30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमनोरंजन'सुशांत सिंह' मृत्यू प्रकरणी 'रिया'ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

टीम लय भारी

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी आज नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चार्जशीट दाखल केली आहे. एनसीबीने सांगितले आहे की, रियाने सुशांतला ड्रग्स दिले होते. चार्जशीटमध्ये रियाचा भाऊ शोविकसह 35 जणांना आरोपी बनवले आहेत. या प्रकरणी 27 जुलैला स्पेशल कोर्टात सुनावणी होणार आहे. जर हे दोघे बहिण भाऊ दोषी सिध्द झाले तर 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

14 जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मुंबईमधील घरी तो मृतावस्थेत सापडला होता. त्याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर आरोप केले आहेत. सुशांत आणि रिया चक्रवर्ती हे रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या मृत्यू पूर्वी एक आठवडा आगोदर रिया सुशांतचे घर सोडून निघून गेली होती. या प्रकरणाची तपासणी करतांना या प्रकरणाला
ड्रग्स तस्करीचे वळण लागले. या प्रकरणाची एनसीबी दीर्घकाळ तपासणी करत आहेत. रियाचा भाऊ पेडलर्सच्या संपर्कात होता. या प्रकरणात रिया चक्रवर्ती बरोबर सैमुअल मिरांडा, शोविक, दीपेश सावंत आणि आणखी दोन जणांचा समावेश आहे.

हे सुध्दा वाचा:

बंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबईकरांनो.. गरज असेल तरच घराबाहेर पडा, शहरात पावसाचा जोर वाढला

गुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग ‘हे’ वाचायलाच हवे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी