28 C
Mumbai
Wednesday, December 7, 2022
घरमनोरंजनSherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार 'बिग बॉस'च्या...

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार ‘बिग बॉस’च्या बाहेर

साजिद खान याच्यावर अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने साजिद खानविरोधात जुहू पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. 29 ऑक्टोबर) ला तक्रार देखील केली आहे.

निर्माता साजिद खान हा बिग बॉसच्या घरात गेल्यापासून घराच्या बाहेर त्याच्या नावाची चर्चा अधिक होताना दिसून येत आहे. साजिद खानवर ‘मी टू’ प्रकरणात काही अभिनेत्रींनकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात पुन्हा एकदा साजिद खान (Sajid Khan) याचे नाव समोर आले आहे. साजिद खान याच्यावर अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने साजिद खानविरोधात जुहू पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. 29 ऑक्टोबर) ला तक्रार देखील केली आहे. त्यामुळे लवकरच साजिद खान याला यासाठी पोलीस ठाण्यात दाखल व्हावे लागेल, असे बोलले जात आहे. साजिद हा खान हा सध्या बिग बॉस हिंदीच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेला आहे.

शर्लिन चोप्रा हिने जुहू पोलीस ठाण्यात साजिद खान याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर शर्लिन चोप्रा हिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शर्लिन चोप्रा यावेळी म्हणाली की, महिला पोलिसांकडून माझा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. लवकरच ते याप्रकारची पुढील कारवाई सुरु करतील. लवकरच साजिद खान याला बिग बॉस च्या बाहेर बोलवून साजिद खान याचा देखील जबाब नोंदविण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

साजिद खान सध्या बिग बॉसच्या घरात बसून आराम करत असल्याचे शर्लिन चोप्रा म्हणाली. जुहू पोलिसांकडून या प्रकरणात लक्ष घालण्यात यावे. मग तो कोणी की असेना, तो फराह खानचा भाऊ असो अन्यथा अभिनेता सलमान खानचा लाडका असो. मला न्याय हवा आहे आणि तो न्याय मला पोलीस मिळवून देतील, याचसाठी मी पोलिसांकडे आले असल्याचे यावेळी शर्लिन चोप्राने प्रसार माध्यमांना सांगितले. पोलिसांकडून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून आरोपी साजिद खानला अटक करण्यात यावी, अशी मागणी शर्लिन चोप्रा हिने केली आहे.

हे सुद्धा वाचा

Mister Mummy Trailer : रितेश-जेनेलिया दोघेही होणार ‘आई’ ?

Allu Arjun Juice : आता मुंबईत मिळणार अल्लू अर्जुन ज्यूस

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका का सोडली ?

दरम्यान, यावेळी शर्लिन चोप्रा हिने अभिनेता सलमान खान याला देखील विनंती केली आहे. सलमान खान याला मी सुद्धा भाईजान बोलते, मी त्यांच्या बहिणीसारखी आहे. त्यामुळे सलमान खान यांनी मला मदत करावी, तसेच तिच्याकडून लवकरच सलमान खान याच्या घराबाहेर शांतीपूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शर्लिन चोप्रा हिच्याकडून देण्यात आली आहे.

सध्या साजिद खान बिग बॉसच्या घरात असून त्याच्या आणि कझाकिस्तानवरून भारतात आलेला पाहुणा अब्दू रोजीक या दोघांच्या जोडीला प्रेक्षक पसंती देत आहेत. पण आता या वादामुळे साजिद खान याला खरंच बिग बॉसच्या घराच्या बाहेर यावे लागेल की नाही हे मात्र सांगता येणे अवघड आहे. याआधी सुद्धा काही अभिनेत्रींकडून साजिद खान याच्यावर अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे साजिद खान याला बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली होती.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!