32 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरमनोरंजनबॉलीवूडच्या भाईजानला जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोईचा धमकीच्या ई-मेलमध्ये...

बॉलीवूडच्या भाईजानला जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोईचा धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख

बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला (Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रोहित गर्ग नावाच्या एका अज्ञात तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. ही धमकी आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुंबईतल्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी कलम ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ या अन्वये प्रकरण दाखल केलं आहे. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली आहे.

सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. यावरून सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिलं की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं.

“गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचं बंद करायचं असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचं असेल तर तसं कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवलं आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ” असा मजकूर पत्रात लिहिला आहे.

कोण आहेत ‘हे’ कुख्यात ?

गोल्डी ब्रार हा पंजाब पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्येही आहे. गोल्डीचं खरं नाव सतिंदरजीत सिंह आहे आणि तो पंजाबमधल्या मुक्तसर साहिब भागात राहतो. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा देखील पंजाब येथील रहिवासी असून बिश्नोईवरसुद्धा सिद्धूच्या हत्येचा आरोप आहे.

लॉरेन्स बिश्नोईनेही सलमान खानला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काळवीट प्रकरणी सलमान खानवर सुरू असलेल्या खटल्यामुळे लॉरेन्सने ही धमकी दिली होती. कारण राजस्थानातील बिश्नोई समाजात काळ्या हरणाची पूजा केली जाते. हा बिश्नोई समाज सलमान खान विरोधात खटला लढत आहे आणि लॉरेन्स देखील याच समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमानच्या हत्येचा कट रचला. त्याची जबाबदारी त्यांनी कुख्यात संपत नेहराकडे दिली. सुत्रांच्या माहितीनुसार,  संपत मुंबईतील सलमानच्या घरावर हेरगिरी केली होती आणि रेड्डी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याचे काम पूर्ण करण्याची योजना आखली होती, परंतु ते अयशस्वी होतात आणि संपत नेहरा पकडला जातो. तो पकडला गेला नसता तर या लोकांनी सलमानवर पुन्हा हल्ला केला असता.

हे सुद्धा वाचा : 

Rambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

नितीन गडकरी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी

‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी