25 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमनोरंजनRambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

Rambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

सलमान खानचा प्रसिद्ध चित्रपट बंधन तसेच जुडवा, क्रोध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनय केलेली अभिनेत्री रंभा हिच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघाता इतका भीषण होता की, या अपघातात अभिनेत्री रंभा यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सलमान खानचा प्रसिद्ध चित्रपट बंधन तसेच जुडवा, क्रोध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनय केलेली अभिनेत्री रंभा हिच्या कारला भीषण अपघात (Rambha Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघाता इतका भीषण होता की, या अपघातात अभिनेत्री रंभा यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. रंभा ही तिच्या मुलांसह आणि आयासह या गाडीमधून प्रवास करत होती. याचवेळी हा अपघात घडला. या अपघातात अभिनेत्री रंभा हिच्या धाकट्या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. रंभाची धाकटी मुलगी साशा अद्यापही रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रंभाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवरून दिली आहे.

रंभाने इंस्टाग्रामवरून दिली माहिती
अपघाताचे हे फोटो स्वतः रंभाने तिच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना रंभाने लिहिले की, ‘मुलांसह शाळेतून परत येत असताना रस्त्यावर एका कारने आमच्या कारला जोरदार धडक दिली. गाडीत मी, मुले आणि आया होतो. आम्हा सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत पण आम्ही सुरक्षित आहोत. माझी धाकटी मुलगी साशा अजूनही रुग्णालयात आहे. वाईट दिवस आणि वाईट वेळ, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत.’ अशी पोस्ट रंभाकडून करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

एअर बॅगमुळे जीव वाचला?
रंभाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रंभा आणि तिचे कुटुंब सुखरूप आहे. तरीही तिची मुलगी साशा रुग्णालयात दाखल आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रंभाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिल्या फोटोमध्ये तिची मुलगी दिसत आहे, जिला डॉक्टर उपचारासाठी घेऊन जात आहेत. दुस-या आणि तिसर्‍या फोटोमध्ये अपघातग्रस्त कार दिसत आहे, ज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या फोटोमध्ये कारच्या एअर बॅग उघड्या असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

Gujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस आक्रमक

Karan Johar : करण जोहर बघतोय पाकिस्तानी सिनेमे! फोटो तुफान व्हायरल

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार ‘बिग बॉस’च्या बाहेर

सिनेविश्वात दीर्घकाळ काम केले
रंभाच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या तब्येतीची विचारणा केली आहे आणि तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या मुलीसाठी प्रार्थना केल्या आहेत. दरम्यान, रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी असून तिने हिंदी तसेच तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. रंभाने काही काळ भोजपुरी चित्रपटातही काम केले आहे. त्यानंतर मात्र आता ती सध्या सिनेविश्वपासून लांब आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!