33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनSawan Kumar Tak Passes Away : बाॅलिवूडला धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार...

Sawan Kumar Tak Passes Away : बाॅलिवूडला धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन

सावन कुमार टाक यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शन, निर्मिती केली आहे. यामध्ये वस, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा, खलनायिका, मां, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का टुकड़ा या सिनेमांचा प्रामुख्याने समावेश होतो.

बाॅलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक (Sawan Kumar Tak) यांचे आज सायंकाळी चारच्या सुमारास निधन झाले. सावनकुमार टाक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डाॅक्टरांकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत होते परंतु त्यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. टाक यांचे मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याचे सुद्धा डाॅक्टरांनी यावेळी सांगितले. सावन कुमार टाक हे 86 वर्षांचे होते. चार दशकांहून अधिक काळ बाॅलिवूड गाजवलेल्या टाक यांच्या निधनाने संपुर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सावन कुमार टाक यांचा भाचा नवीन टाक यांनी याबाबत अधिक माहिती सांगताना म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून टाक यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता. त्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता शिवाय तापही येत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांची फुफ्फुसे पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. फुप्फुस निकामी झाल्याचे कळल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू होते. त्यातच त्यांच्या हृदयाचे ठोकेही अनियमित झाले. त्यांची प्रकृती गंभीरच होती, अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे नवीन यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

session : अखेर आजच्या अधिवेशनात ‘नामांतराला’ संमती मिळाली

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःला म्हटले ‘कंत्राटी मुख्यमंत्री’

Transgender :आता तृतीयपंथींना देखील मिळणार केंद्र सरकारकडून आरोग्य सुविधा

सावन कुमार टाक यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शन, निर्मिती केली आहे. यामध्ये वस, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा, खलनायिका, मां, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का टुकड़ा या सिनेमांचा प्रामुख्याने समावेश होतो. टाक यांनी राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा, सलमान खान यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी