28 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमनोरंजनशाहरुख आणि सनीचा ३० वर्षांचा अबोला संपला

शाहरुख आणि सनीचा ३० वर्षांचा अबोला संपला

अभिनेता शाहरुख खान आणि सनी देओल सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत. 90 च्या या दोन्ही कलाकारांच्या करिअरची झेप पाहता येत्या 50 वर्षांत कोणाही दुसऱ्या कलाकाराला हे अभूतपूर्व यश मिळणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात. शनिवारी सनी देओलने आयोजित केलेल्या ‘गदर 2’ च्या सक्सेस पार्टीला चक्क बादशाह खाननं हजेरी लावली. एरव्ही एकमेकांबद्दल चकार शब्दही न काढणाऱ्या दोघांची गळाभेट पाहता आता जुनी मैत्री पुन्हा नव्याने बहरली.

सनी आणि शाहरुखच्या वादाचे कारण काय? 
सनी देओल आणि शाहरुख खाननं 1993 साली ‘डर’ सिनेमात एकत्रित काम केलं. चित्रपटात जूही चावला नायिका होती. ‘डर’ चित्रपटात शाहरुख नकारात्मक भूमिकेत होता. सिनेमात सनी देओल हिरोच्या भूमिकेत असतानाही सर्व फुटेज शाहरुखला दिलं गेलं. त्याकाळी शाहरुख नवोदित कलाकार होता. शाहरुखला जास्त भाव दिल्यानं सनी देओल निर्माते यश चोप्रा आणि शाहरुखवर चांगलाच वैतागला. सनीनं पुढे यशराज फिल्म्ससोबत काम केलं नाही. शाहरुखसोबत त्यानं 30 वर्ष अबोला धरला.

सनी देओलचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचवत आहे. तीन आठवड्यात सिनेमानं 450 कोटीपेक्षाही जास्त कमाई केली आहे. त्यानिमित्तानं शनिवारी सनी देओलनं मोठ्या पार्टीचं आयोजन केलं. इंडस्ट्रीतील सर्व कलाकार पार्टीला हजर राहिले. सलमान खान, आमीर खान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, वरुण धवन, सारा अली खान, इब्राहिम अली खान, कार्तिक आर्यन या तरुण कलाकारांनीही पार्टीत उपस्थित राहून सनी देओलला शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा 

कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…

सलमान, कतरिना दिवाळीत देणार चाहत्यांना खुशखबर !

आपला लाडका मॅडी झाला एफटीआयआयचा अध्यक्ष

या पार्टीत बादशाह खानचं आगमन सर्वांनाच अचंबीत करणारं ठरलं. सनी आणि शारुख एकमेकांसमोर येताच त्यांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली. जुने हेवेदावे विसरून नव्याने चांगल्या मैत्रीची सुरुवात झाल्याने बॉलिवूडमध्ये जुन्या कलाकारांची चलती अजून दम धरणार अशा चर्चा रंगू लागल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी