30 C
Mumbai
Tuesday, September 26, 2023
घरमनोरंजनआपल्या दिव्यांग फॅनचं प्रेम पाहून शाहरुखही भारवला!

आपल्या दिव्यांग फॅनचं प्रेम पाहून शाहरुखही भारवला!

अभिनेता शाहरुख खानचं यंदाच्या वर्षी ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन सलग हिट चित्रपट दिलेत. ‘जवान ‘ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. एका दिव्यांग फॅन चक्क व्हेन्टीलेटरवर चित्रपटगृहात आला. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खुद्द शाहरुखलाही गहीवरून आलं. शाहरुखनंही आपल्यावर निर्वाज्य प्रेम करणाऱ्या फॅनवर कृतज्ञता व्यक्त केली.

‘एक्स’ पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया अकाऊंटवर शाहरुखच्या फॅन अकाउंटवर दिव्यांग रुग्ण एसआरकेचा जवान पाहायला आल्याचा व्हिडिओ पोस्ट झाला. एका अपंग व्यक्तीनं शाहरुखच्या जवान चित्रपटासाठी खास हजेरी लावली. एसआरकेसाठी डोक्यापेक्षा मनाचं ऐकायचं असतं. अशी केप्शन ‘एसआरके राजरहट सीएफसी’ या एक्स अकाऊंटवर दिली गेली.

या अकाउंटवर संबंधित दिव्यांग व्यक्तीचा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला. शाहरुखला टेग करत अपंग फॅनबाबत ‘एसआरके राजरहट सीएफसी’ फॅन अकाऊंटनं कळवलं. आपला सिनेमा पाहण्यासाठी चक्क व्हीलचेअरवर आणि व्हेन्टीलेटरवर आलेल्या फॅनला पाहून शाहरुखनंही तातडीने ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया नोंदवली. तुला चित्रपट आवडला असेल अशी मी आशा करतो. ‘तुझे प्रेम पाहून मी भारावून गेलोय. तुला जगातला सर्वोत्तम आनंद मिळो, धन्यवाद मित्रा आणि खूप सारे प्रेम’ अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली.

हे ही वाचा 

आता रणबीर, टायगर घालणार बॉक्सऑफिस वर धुमाकूळ, आगामी अ‍ॅक्शन चित्रपटांचे पोस्टर्स प्रदर्शित

स्वरा भास्करचे बेबी बंप फोटोशुट झाले व्हायरल !

ठरलं तर… ‘या’ दिवशी होणार शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित!

शाहरुख आता आपल्या आगामी ‘डंकी’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात शाहरुखसह तापसी पन्नूची महत्वाची भूमिका आहे. काश्मीर आणि लंडनमध्ये सिनेमाचं शूटिंग पार पडलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ‘डंकी’ प्रदर्शित होईल. सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी