30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमनोरंजनजवानच्या सक्सेस पार्टीत नयनताराच्या आईसाठी शाहरुखनं गायलं गाणं

जवानच्या सक्सेस पार्टीत नयनताराच्या आईसाठी शाहरुखनं गायलं गाणं

‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवड्यात उलटल्यानंतर अभिनेता शाहरुख खाननं टीम सोबत जंगी सक्सेस पार्टी केली. अभिनेत्री दीपिका पादुकोण, दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती, दिग्दर्शक अटली आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्यासह गर्ल टीमला सोबत घेत मुंबईत जंगी पार्टी करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करत शाहरुखनं प्रसारमाध्यमांशी गप्पाही मारल्या.

यंदाच्या वर्षी पठाण आणि जवान हे दोन्ही शाहरुखचे चित्रपट हिट ठरले. ‘पठाण’ चित्रपटानं ४५० कोटीपर्यंत बिझनेस केला. आठवड्याभरात ‘जवान’ चित्रपटानं ६६० कोटी पर्यंतची कमाई केली आहे. दोन दिवसातच ‘जवान’ चित्रपटानं १२० कोटी रुपये कमावून नवा विक्रम नोंदवला. या चित्रपटामुळे दक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचं हिंदी सिनेसृष्टीत दणक्यात आगमन झालं. मात्र नयनतारा या सक्सेस पार्टीपासून लांब राहिली. ते आपल्या परिवारासोबत चेन्नईत होती. १५ सप्टेंबरला नयनताराच्या आईचा वाढदिवस असतो. त्यामुळे नयनताराला मुंबईत सक्सेस पार्टीत येणं जमलं नाही. नयनतारा पार्टीत न येण्यामागचं कारण खुद्द शाहरुखनेच प्रसार माध्यमांना दिलं. शाहरुखनं नयनताराच्या आईसाठी वाढदिवसाचं गाणंही गायलं. शाहरुखचा दिलदारपणा पाहताच सर्वांनीच त्याला दाद दिली.

नयनताराचं पहिलाच हिंदी चित्रपट हिट ठरला असताना तिने मुंबईत न येणं पार्टीत उपस्थित बऱ्याच जणांना आवडलं नाही. मात्र पार्टीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इतर कलाकारांनी हजेरी लावली. सुनील ग्रोवर, सानिया मल्होत्रा, आलिया कुरेशी आणि लेहर खान सक्सेस पार्टीत उपस्थित होते. सर्वांनी मिळून चित्रपटातील गाण्यावर मनसोक्त नाचही केला. दीपिका आणि शाहरुखनं ‘चलेया’ या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरला.

हे ही वाचा

ठरलं तर… ‘या’ दिवशी होणार शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित!

अक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा मुलगा झाला 21 वर्षांचा; मुलाबद्दल काय म्हणाले मॉम आणि डॅड ?

मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !

‘जवान’ चित्रपट हा केवळ माझ्यासाठीच नाही तर समस्त भारतीयांसाठी खास होता. चुकीच्या गोष्टी विरोधात लढणाऱ्या प्रत्येकामध्ये जवान लपलेला असतो. जवान पुरुष आणि महिला दोघंही असतात, हात संदेश चित्रपटाच्या माध्यमातून दिला गेलाय, असंही शाहरुख म्हणाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी