30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमनोरंजनठरलं तर... 'या' दिवशी होणार शाहरुखचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित!

ठरलं तर… ‘या’ दिवशी होणार शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित!

अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटानं प्रदर्शनाच्या आठवड्याभरात ६६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत शाहरुख खाननं प्रसार माध्यमांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यंदाच्या वर्षात माझा अजून एक चित्रपट येत असून, बहुचर्चित ‘डंकी’ हा चित्रपट येत्या नाताळच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी घोषणा शाहरुख खाननं केली.

तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखचे यंदाच्या वर्षापासून चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्याअगोदर शाहरुखचे ‘रईस’, ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘झिरो’ हे तीन चित्रपट दणाणून आपटले. यंदाच्या वर्षात शाहरुखचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. ‘पठाण’नं जगभरात ४५० कोटी पर्यंतची कमाई केली. ‘जवान’ चित्रपटानं आठवड्याभरात ६६० कोटी रुपये कमावले. दोन्ही चित्रपटांसाठी सोशल मीडियाचा प्रमोशनकरिता वापर केला गेला. रियालिटी शोमध्ये हजेरी देणं, प्रसारमाध्यमांसोबत मुलाखती या टिपिकल प्रमोशन पद्धती शाहरुखनं कटाक्षनं टाळल्या. ‘जवान’च्या सक्सेस पार्टीत सर्व पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देत होता.

यंदाच्या वर्षात माझे दोन्ही सिनेमे सण उत्सव काळातच प्रदर्शित झाले. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ‘पठाण’ प्रदर्शित झाला. जन्माष्टमीला ‘जवान’ प्रदर्शित झाला. वर्षाच्या अखेरीस नाताळच्या सणानिमित्त ‘डंकी’ प्रदर्शित होईल, असं शाहरुखनं जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तो पुढे म्हणाला की, माझे सिनेमा जेव्हा प्रदर्शित होतात त्यादिवशी ईदही साजरी होते.

हे ही वाचा 
‘डंकी’ सिनेमाच्या निमित्तानं शाहरुख पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत काम करतोय. चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू महत्त्वाची भूमिका साकारतेय. या सिनेमात संजय दत्त, हर्षद वारसी मुन्नाभाई आणि सर्किटचं पात्र साकारत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. डंकी सिनेमाचा शूटिंग भारतात काश्मीर आणि परदेशात लंडन येथे पार पडलं आहे. लंडनमध्ये शाहरुख आणि तापसी पन्नूच्या शूटिंगचे फोटोही सोशल मीडियावर वायरल झालेत. या सिनेमाची निर्मिती शाहरुखची निर्मिती कंपनी असलेल्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’कडून केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी