34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनशाहरुखसाठी इंग्लंडच्या सरकारने केले होते असे काही; मराठी दिग्दर्शकाने सांगितला १८ वर्षांपूर्वीचा...

शाहरुखसाठी इंग्लंडच्या सरकारने केले होते असे काही; मराठी दिग्दर्शकाने सांगितला १८ वर्षांपूर्वीचा स्टारडमचा किस्सा

बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट काल जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या चित्रपटग्रहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून प्रेक्षकांच्या तिकीटासाठी रांगा लागत आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटाला दिलेला प्रतिसाद पाहता शाहरुख खानचे स्टारडम किती मोठे असू शकते याची कल्पना येते. शाहरुखच्या पठाण चित्रपटावरुन मराठी चित्रपट दिग्दर्शक (Marathi film director) हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी शाहरुखबाबतची इंग्लंडमधील (England) १८ वर्षांपूर्वीची एक आठवण सोशल मीडियावर सांगितली आहे.  (Shah Rukh Khans England memory told Marathi film director Hemant Dhome)

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या आठवणीचा किस्सा ट्विटरवर सांगितला आहे. त्यात त्यांनी ते जेव्हा इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यावेळी शाहरुख खान याच्याबाबतीत एक आठवण सांगितली आहे. शाहरुख खान याचा पठाण चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याच्या स्टारडमबाबत त्यांनी या पोस्टमध्ये लिहीले आहे. एका सामान्य घरातून आलेला एक सामान्य मुलगा आपल्या मेहनत आणि हुशारीने हुशारीने कुठल्या कुठे जाऊ शकतो याचं हे उदाहरण…आपण शांतपणे आपलं काम करावं मेहनत करावी… आपलं कामंच बोलतं! बाकी अडचणी वगैरे येतच राहतात… आपण पुढे जात रहावं! असे देखील हेमंत ढोमे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


हेमंत ढोमे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे, मी इंग्लंडमधे असताना शिक्षण संपल्या नंतर काही काळ नोकरी करत होतो… एक दिवस कामावर निघालो ट्युब स्टेशन वर आलो आणि कळलं आजचा प्रवास मोफत असणार आहे. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आज शाहरूख खान चा कार्यक्रम आहे लेस्टर स्केअरला. म्हणुन तिथल्या सरकारने सर्वांसाठी प्रवास मोफत केलाय… मग लक्षात आलं ते स्टारडम म्हणजे काय असतं… आपल्या देशाबाहेर आपल्यासाठी तिथलं सरकार प्रवास मोफत करतं तुमचं काम सेलिब्रेट करतं! कमाल! आज पठाणच्या निमित्ताने १८ वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला… आजही त्या माणसाची जादू कायम आहे… हे खूप इन्स्पायरिंग आहे.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

बाबा हवे तर असे: लेक सुहानाच्या फोटोंवर शाहरुख खानची विनोदी टिप्पणी

सांगलीच्या चाहत्यांची कमाल; ‘पठाण’साठी केले अख्खे थिएटर बुक

अभिनेता शाहरुख खान याच्याबाबतीतली १८ वर्षांपूर्वीची आठवण हेमंत ढोमे यांनी सांगितली आहे. पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड देखील चालवला गेला. मात्र शाहरुख खान याने हे सर्व अतिशय शांततेत घेतले. या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड गर्दी चित्रपटग्रहांबाहेर पहायला मिळत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी