28 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमनोरंजन...आणि शाहिद कपूर भावाच्या लग्नात संतापला !

…आणि शाहिद कपूर भावाच्या लग्नात संतापला !

अभिनेता शाहिद कपूर सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ओटीडी प्लॅटफॉर्मवर शाहिद कपूरचे सिनेमे, वेब सिरीज प्रचंड धुमाकूळ घालत असताना त्याच्या एका वागण्यानं तो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलाय. शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान शाहीदनं पापाराझीना भलतच सुनावलं. शाहीद अवतारात आल्यानं पापाराझीही कमालीचे शांत झाले.

 शाहीदच्या भावाचं शनिवारी लग्न होतं. शाहिदची पत्नी मीरा, दोन्ही मुलं, सासू लग्नाला उपस्थित राहिले. लग्नाच्या ठिकाणी शाहीदच्या अगोदर पापाराझी आले होते. सासू आणि मुलांना लग्नाच्या ठिकाणी गेटच्या आत सोडल्यानंतर शाहिद आणि मीरानं फोटोग्राफरला पोजही दिली. शाहिद परत येईपर्यंत फोटोग्राफर तिथेच थांबले होते. एव्हाना गर्दीही जमा झाली होती. गेट पासून गाडी पर्यंत जायला शाहिदला कुटुंबासमवेत चांगलीच मक्कत करावी लागली. शाहिदनं दोन्ही मुलांना अगोदर सुरक्षितरित्या गाडीत पाठवलं. पत्नी मीरा आणि सासूबाईंना गाडीपर्यंत पोहोचवताना फोटोग्राफर शाहिदच्या नावाने किंचाळू लागले. वाढत्या गर्दीमुळे पत्नी मीरा आणि सासूबाईंना अनोळखी माणसाचा धक्का लागण्याची दाट शक्यता होती.

फोटोग्राफरचं किंचाळणं थांबतच नसल्यानं अखेर शाहीदचा पारा चढला. मी जवळच असताना किंचाळता कशाला? तू वेड्यासारखा किंचाळतो कशाला? शांतपणे बोल या शब्दात शाहिदनं फोटोग्राफरला सुनावलं. शाहिद अवतारात आल्याने आजूबाजूचे सर्वजण शांत झाले. एरव्ही शाहिद फोटोग्राफरला सहकार्य करतो. विमानतळ असो वा जिम, फोटोग्राफर दिसताच शाहिद त्यांच्यासाठी पोझही देतो. मात्र फोटोग्राफरमुळे कुटुंबीयांना अडचण होत असल्याने शाहिदनं भर रस्त्यात त्यांना भलतंच सुनावलं.

हे सुद्धा वाचा 
गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा

 जाहिरातींमध्ये शाहिद आणि पत्नी मीराची जोडी भलतीच लोकप्रिय ठरत आहे. दोघांनाही जाहिरातीसाठी प्रचंड ऑफर्स येत आहेत. शाहिद आणि मीरा दिसताच फोटोग्राफर्स एका पोझसाठी त्यांच्या मागे लागतात. शनिवारी झालेली घटना संवेदनशील ठरल्यानं शाहिदचं वागणं बरोबर असल्याची प्रतिक्रिया नेटीझन्सनं दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी