28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमनोरंजनशाहरुख आणि नयनताराचं तिरुपती दर्शन!

शाहरुख आणि नयनताराचं तिरुपती दर्शन!

‘जवान’ चित्रपटाच्या रिलीजसाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारानं तिरुपती मंदिराचे दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखसोबत मुलगी सुहाना तर नयनतारा नवरा विघ्नेशसोबत आली होती. ‘जवान’ चित्रपटाच्या यशासाठी टीमने गणपतीचे दर्शन घेतलं.
चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत दीड लाख तिकीटचं ॲडव्हान्स बुक झाल्यानं शाहरुखनं नवा रेकॉर्ड रचला आहे. जवान चित्रपटात महागड्या किंमतीच्या व्हीएफएक्स वापर करण्यात आलाय. चित्रपटात शाहरुखसह नयनताराही स्टंट करताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आठवड्याभरात तब्बल चार कोटीहून अधिक प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय. युट्युबवर ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर सातव्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.
यंदाच्या वर्षात शाहरुख खानचा ‘जवान’ हा दुसरा चित्रपट आहे. वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखनं ‘पठाण’ सिनेमातून कमबॅक केलं. पठाण सिनेमांनं ४०० कोटींहून अधिक कमाई केली. ‘जवान’ चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
हे ही वाचा 
‘पठाण’ चित्रपटासारखं शाहरुख ‘जवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रियालिटी शोला जाणं टाळतोय. शाहरुखनं सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करत थेट फॅन्सशी संवाद साधणंच पसंत केलंय. शाहरुखचा हा फॉर्मुला ‘जवान’साठी हिट ठरतोय. सिनेमा ‘गदर २’ प्रमाणेच ५०० कोटींपर्यंत कमाई करेल का? याबाबत मात्र चित्रपट व्यापार तज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. सिनेमा फार फार तर ४०० कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज चित्रपट व्यापार तज्ञांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी