अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटानं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलंय. जगभरात ‘जवान’ चित्रपटाला सर्व वयोगटातून पसंती मिळतेय. चित्रपटाचा क्लायमेक्स पाहता ‘जवान २’ हा सिक्वेलही बनवला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दिग्दर्शक अटली आणि निर्माता शाहरुख खान आणि गौरी खान यांनी मात्र कमालीची गुप्तता पाळली आहे. चित्रपटातील संजय दत्त स्पॉईलर अलर्ट देतोय. संजय दत्तचं पात्र ‘जवान’ चित्रपटाचा सिक्वेल येत असल्याची हिंट देतोय.
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. दोन दिवसांत चित्रपटानं १२९ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. चित्रपटातून नयनतारा या दक्षिणात्य अभिनेत्रीनं हिंदी सिनेमासृष्टीत पाऊल ठेवलं. सिनेमात शाहरुखच्या आझाद राठोडला सहा महिला अन्यायाविरोधात लढताना मदत करतात. त्यापैकी लेहेर खान, सानिया मल्होत्रा आणि प्रियमणी या तीन महिलांची कथा सांगण्यात आलीये.
गिरीजा ओक-गोडबोले, संजिता भट्टचार्य आणि आलिया कुरेशी या तिघींची कथा जवान चित्रपटात जाणूनबुजून ठेवलेली नाही. तीन तासांच्या चित्रपटात सहा महिलांची कथा दाखवता येत नाही. चित्रपटाच्या शेवटाला आझाद आणि विक्रम राठोड दुसऱ्या लढ्यासाठी तयार होत असल्याचं दाखवण्यात आलंय. तीन महिलांची कहाणी आणि आझाद आणि विक्रम राठोडचा नवा लढा कोणता, हा प्रश्न प्रेक्षकांच्या सतत मनात रेंगाळत राहतो. यातूनच दिग्दर्शक अटली सिक्वेलची हिंट देतोय.
हे सुद्धा वाचा
मनसेचे आमदार राजू पाटील संतापले, नावापुढे डॉक्टर लावणाऱ्या आयुक्त, खासदारांना लोकांची नस सापडली नाही!
कोरोना काळात नोकरी गेली, उपासमारीची वेळ आली; पण बाप्पाने चिंता मिटवली
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुसेसावळीत जाळपोळ, दंगल
पहिल्या भागात शेतकऱ्यांची आत्महत्या, आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि एव्हीएम मशीन बनवताना आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य करण्यात आलंय. सिनेमात दीपिका पाडूकोण आणि संजय दत्त पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचा क्लायमेक्स फारसा पटत नाही, ही टीका जोरदार होत आहे.